Saturday 27 April 2019

"Conduct Risk & रामनवमी "

एप्रिल महिना चालू झाला की परदेशी वित्त संस्थेमध्ये  काम करणाऱ्या लोकांची धांदल सुरु होते।  सरलेल्या तिमाहीचा आढावा  घेण्यासाठी  वेगवेगळ्या आढावा बैठका (Review Catch ups) घेतल्या जातात।  जानेवारी मध्ये ठरविल्या प्रमाणे  आपली कामगिरी (Performance) चालू आहे का  किंवा पहिल्या तिमाहीमध्ये (Quarterly Results) कामगिरीचे मूल्यांकन करताना आपण कुठे बरोबर काम केले  , कुठे कमी पडलो , कुठे जास्त लक्ष दिले पाहिजे असा सगळा लेखाजोखा मांडला जातो। परदेशी वित्त संस्था "जानेवारी ते डिसेम्बर " असे आर्थिक वर्ष मोजत असल्याने  पहिल्या तिमाहीची कामगिरी अधिक महत्त्वाची ठरते।  क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर हे सुरवातीच्या बैटिंग पॉवरप्ले सारखे आहे. ज्याला आपण  गति ठरवणे ( Rhythm Setting) म्हणतो तसेच पहिल्या तिमाहीची कामगिरी  पुढील  वर्षाच्या वाटचालीची दिशा ठरविणारी असते।


वर्षाच्या सुरवातीला जी युध्दनीति किंवा रणनीति (Strategy) आखलेली असते  त्याप्रमाणे  धोरण अंमलबजावणी होते आहे ना, ती करत असताना संस्थेची जी काही तत्त्वे किंवा नियमावली आहे त्याचे पालन होते आहे ना  याचाही विचार केला  जातो। सध्या या नीतियुद्धाचे ( Compliance, Ethics, Code of Conduct etc.) पालन करुन युध्दनीति(Strategy) राबवून ध्येय साध्य करणे  महत्त्वाचे।  याला असणारी  २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाची पार्श्वभूमी अणि जागतिक पातळीवर वित्त संस्थाची प्रतिमा या मुळे  दरवर्षी  सर्व कर्मचाऱ्यांसाठी "Conduct Risk" या नावाने  ऑनलाइन रिफ्रेशर ट्रेनिंग आयोजित केले जाते।

थोडक्यात  या ट्रेनिंगचे वर्णन करायचे तर वित्तसेवा  क्षेत्रात रोजचा व्यवसाय करत असताना  " ग्राहकाला  केंद्रस्थानी ( Customer First)  ठेऊन त्याच्या गरजा अणि अपेक्षा जाणून ( Client's Need) घेऊन  आपली सेवा त्याची निकड( Product suitability & Placement ) कशी पूर्ण करू शकेल  याचा अभ्यास करुन , ती सेवा ग्राहकाला योग्य किंमतीला ( service at right price), स्थानिक  नियमावलीच्या(Compliant with local Regulations)  अधीन  राहुन उपलब्ध करून देणे; जेणेकरून  अशा  सचोटीने(Ethics) केलेल्या व्यवसायामुळे "mis-selling", " Wrong selling", " Aggressive Product Pitch" सारख्या  प्रकारांना आळा  बसून  " शाश्वत वित्त सेवा पुरवठ्यासाठी " ( Sustainable Finance) वाटचाल करता येईल। 

जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे  पुढील आठवड्यामध्ये  ऑफिस सुरू झाल्यावर रिफ्रेशर ट्रेनिंग पूर्ण करून टाकावे असा विचार केला अणि  बसमध्ये बसून सध्या  जो " लोकशाहीचा उत्सव " चालू आहे( २०१९ च्या लोकसभा निवडणुका ), त्याचविषयीच्या बातम्या  अणि  नेत्यांची भाषणे  ऐकणे चालू केले।    एका राष्ट्रीय  पक्षाचा  प्रवक्ता  त्याच्या पक्षाची भूमिका समजावून सांगत होता  अणि  तो सहज म्हणाला " श्रीराम हा आमच्यासाठी निवडणुकीचा मामला  नसून तो आमच्या आस्थेचा विषय आहे. "राम , आस्था , श्रद्धा " असे शब्द ऐकले की मी जरा भावूक होतो  अणि आपसूकच  भूतकाळात रमतो।  कारण मला माझी आजी आठविते।  रामनवमीचा उत्सव  व तिचे भजन आठविते।

सांगलीतील  रामाचे मंदिर , रामनवमीच्या उत्सवासाठी सजविलेला पाळणा , बायकांची लगबग, त्यांचे उपास , भजनाचा कार्यक्रम अणि शेवटी " सुंठवड्याचा प्रसाद " असा  सगळा  घटनाक्रमच  डोळ्यासमोर उभा राहतो। लहानपणी(?)  गाण्यापेक्षा  खाण्याकडे माझा कल जास्त असल्याने  कधी एकदा "रामजन्म " होतो अणि भजने संपून  "सुंठवड्याचा प्रसाद" वाटला जातो याच्याकडेच माझे डोळे लागलेले असायचे। बर श्रीरामांचा जन्म पण एकदम टळटळीत दुपारच्या वेळेचा ( भूकेने आमच्या पोटात कावळे ओरडायला लागायचे )।  अश्यावेळी माझी मारुती भक्ति उफाळून यायची।  मारुतीरायाने  सकाळी सकाळी जन्म घेतल्यामुळे पूजा अणि इतर धार्मिक विधी सकाळी लवकर संपत असल्यामुळे प्रसादासाठी फार ताटकळत थांबावे लागत नसे।  असो।" राम जन्मला ग सखे /राम जन्मला /" ची काही आवर्तने झाली की  बरोबर माध्यान्हिला  " रामजन्माचा " कार्यक्रम पूर्ण व्हायचा।  सर्वाना " रामाच्या पागोट्याचे  सूत  अणि सुंठवड्याची पूड़ी " प्रसाद म्हणून दिले जायचे।

त्या वेळी  प्रसादाच्या पुढे  त्या "सुताचा " अर्थ कधी विचारावा वाटला नाही।  पुढे  मोठे झाल्यावर  त्या परंपरेमागे काय हेतू असेल  हे जाणून घेण्याचा प्रयत्न  कधी केला  नाही। आज तो  प्रवक्ता जेव्हा म्हणाला " राम " ही एक "आस्था" आहे , तेव्हा  शांतपणे विचार केला  अणि जाणवू लागले की   पुराणांमध्ये आपण कायम " ब्रह्मा , विष्णु अणि महेश " या त्रिमूर्तीचा उल्लेख करतो ज्यामध्ये "ब्रह्मा " या जगाचा निर्माता असतो, तर या विश्वाचे   जतन करण्याचे , त्याला स्थिरता देण्याचे काम हे " विष्णुचे".  नाटकाच्या भाषेत सांगायचे तर ब्रह्मा हा नाट्यनिर्माता तर   विष्णु हा  " दिग्दर्शक ". जीवनरूपी रंगभूमीवर अविष्कार निर्माण करण्यासाठी दिशा दाखविणारा ।

या विष्णूचा सातवा अवतार मानला जाणारा राम हा " रघुकुलवंशीय  राजा " म्हणूनच भारतीयांसाठी  एक " जीवन जगण्याचे आदर्श टेम्पलेट " आहे. त्यामुळे " विश्वाचे जतन ( Preserver of World) करणारा हा देव परका वाटत नाही।  तो राजा असूनही देव असतो अणि देव असूनही तो आपल्या भक्तांसाठी "सखा रघुवीरच " असतो।

"एक वचनी ", " एक बाण ी " असणारा  हा  "मर्यादा पुरुषोत्तम " म्हणूनच "Mr. Dependable" असतो.  राम हे खऱ्या अर्थाने " आशा(Hope)  , आकांक्षा( Dreams) , स्थिरता( Stability) अणि  भरभराट (Prosperity)"याचे प्रतिक आहे . संकटाच्या प्रसंगी , अस्थिर वातावरणात  म्हणूनच "रामाचा " धावा केला जातो।   सामाजिक मुल्ये , नीती याची कास धरुन उभ्या राहणाऱ्या कल्याणकारी , सुखी राज्याच्या संकल्पनेला म्हणून " रामराज्य " म्हटले जाते।
राम  हा नुसताच देव नसून ती जगण्याची रीत आहे। म्हणूनच  एखादा माणूस वेडावाकडा वागला किंवा बोलला तर " त्याचात काही राम उरला नाही " असे म्हटले जाते।  राम हे विश्वासचे प्रतिकच मानले जाते  म्हणूनच  तर  उत्तरेत " जो ना  राम का वो ना किसी काम का . " असे म्हणण्याची पध्दत आहे. हे सर्व विचार केल्यानंतर कळले की " आस्था" म्हणजे " आपुलकी किंवा " कळकळ " या विश्वासातून निर्माण झाली आहे।

"भाबड्या या भक्तासाठी देव करी काम। कौसलेचा राम बाई;कौसलेचा राम। " या गीतामध्ये आपल्या भक्तांच्या मदतीला धावणाऱ्या रामाचे वर्णन केले आहे। भोळी भक्ती बाजूला ठेऊन जर  विचार केला  तर आपल्या लक्षात येईल की " जर आपण राममार्गाने(Compliance, Ethics, Code of Conduct) चाललो तर आपल्या आशा(Hope)  , आकांक्षा( Dreams) पूर्ण होऊन  आपल्या जीवनाला स्थिरता( Stability)प्राप्त होईल व  मनुष्याची "भरभराट (Prosperity)" होईल।

मग ध्यानात  आले  की ते " रामच्या पागोट्याचे सूत " म्हणजे "ती आस्था" आहे।  राममार्गाने जगण्यासाठी दिलेली प्रेरणा आहे  जी आपल्या जीवनात स्थिरता( Stability),भरभराट (Prosperity) आणेल व ते जीवन अधिकाअधिक शाश्वत बनेल।

 डोक्यात प्रकाश पड़ला अणि लक्षात आले की "Conduct Risk" ट्रेनिंग म्हणजे भाबड्या (?) कस्टमररूपी भक्तासाठी, राममार्ग ( Ethics, compliance ) अवलंबून केलेली सेवा अणि त्यातून निर्माण होणारा  विश्वास जो स्थिर,शाश्वत वित्त सेवेसाठी ( Sustainable Finance) उपयोगी पडेल।


सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा  क्योंकि "राम हमारे आस्था का विषय है. "

  

2 comments:

  1. Nicely written. You have the gift of the gab. Keep writing.
    Every article must carry a message. It should build a tempo that keeps the reader glued to it. Your blogs do satisfy these necessary points.
    Best wishes.
    Raja Malushte.

    ReplyDelete

  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...