Sunday 29 March 2020

Opinion: Chinese wet markets are not your scapegoat | The Michigan ...  कुणाचा  घास  जगाला ताप !

सध्याच्या घडीचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे  कोरोना विषाणू  अणि त्यामुळे पसरलेला साथीचा आजार।  १७० देश , ६००००० + बाधित रूग्ण अणि ३००००  लोकांचे मृत्यू असा खऱ्या अर्थाने वैश्विक म्हणता येईल असा हा रोग ज्याने पूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे।  निसर्ग अणि हे जंतु यांचे एक बरे असते अशा वेळी श्रीमंत  किंवा  गरीब लोक  ,प्रगत किंवा  उगवत्या अर्थव्यवस्था असा भेदभाव केला जात नाही।"WHO " ने म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आता याला "महामारीचे " स्वरुप प्राप्त झाले आहे। निसर्गावर मात वैगरे करून "Master of Universe " बनू पाहणाऱ्या मानवाला  उपाययोजना म्हणून केलेल्या "Lock down " मुळे "Animal in the cage" चा अनुभव घ्यावा लागत आहे।  गुलजार साहेबांच्या भाषेत सांगायचे तर "ये शहरोंका सन्नाटा बता रहा है , इन्सानों  ने कुदरत को नाराज बहुत किया है "

२००३ मध्ये  २९  देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या  SARS  च्या विषाणूंचे   मूळ शोधण्यासाठी संशोधन केले गेले तेव्हा त्याची पाळेमुळे  निघाली ती  "शू हॉर्स " जातीच्या  वटवाघुळामध्ये।  वटवाघुळ ते उदमांजर किंवा मूंगुस  (Civet Cats ) यांच्या मार्फत तो  माणसापर्यन्त पोचला।  अणि त्याचे उगमस्थान होते चीन मधील "Wet " मार्केट जिथे "वन्य "जीवांची (Wild Animals ) ची  मांस किंवा  मेडिसिन साठी खरेदी -विक्री होते।  २०२० मध्ये
थैमान घालणारा "कोरोना " विषाणू(Kovid -१९ ) याच "SARS" घराण्यातील।  यावेळी त्याचे उगमस्थान आहे "Hubei " राज्यातील "Wuhan " शहरातील "Seafood Market " जिथल्या मेनू किंवा रेट कार्ड मध्ये  जगातील जवळ जवळ सर्व वन्य जीव  उपलब्ध आहेत।

लोकसत्ताकारांच्या भाषेत बोलायचे झाले तर " अशक्त विचार अणि सशक्त प्रचार "च्या या समाजमाध्यमांनी  व्यापलेल्या जगात त्यामुळे प्रचारकी  बाण्याने  याचे  " China Virus " किंवा " Wuhan Virus " असे नामकरण केले गेले।  हे चीनी लोक काहीही खातात अणि आम्हांला त्याचा त्रास भोगावा लागतो असे एक चित्र उभे राहिले ।  समाजमाध्यमांवर "Fruit BAT " for  breakfast , "Pangolin blood fried rice" , "Sea Cucumber Soup ","Civet Roast ", " Shark Fin Soup", "Pangolin  Scale  Stew " अशा रेसिपीस  बनविण्याचे अणि चीनी लोक ते आवडीने खात असलेले वीडियो प्रसिद्ध झाले  अणि त्यांना प्रचंड ट्रोल पण केले गेले।

एक बाजूला " रासायनिक -जैविक ( Bio -Chemical Warfare ) " युद्धाचा हा भाग आहे  अशी शक्यता व्यक्त होत आहे , चीन -अमेरिका व्यापार युद्धाची पाश्वर्भूमी असल्यामुळे ते तसे नसेल असे ठाम सांगणे अवघडच। पण ते तसेच आहे यासाठीचा सज्जड पुरावा अजून तरी उपलब्ध नाही।  "South China Post " या चिनी वृत्तपत्राने " Wuhan  Virology  Lab " मधील संशोधकांच्या मुलाखती प्रसिद्ध करून  हा "Lab Made " विषाणू कसा असू शकणार नाही याची माहिती जगाला करून दिली। ते काहीही असो सध्या भक्कम पुराव्या अभावी हे  मतप्रदर्शन दबक्या आवाजातच सिमित राहील।

साहजिकच त्यामुळे "चीनी लोक अणि त्यांचे खानपान " हा कुतूहलाचा विषय बनला आहे।  साथीच्या रोगांचा इतिहास असे सांगतो की १९व्या शतकातील प्लेगचा अपवाद वगळता बहुतेक सर्व साथीच्या  आजारांचे माहेरपण जाते चीनकड़े। बोट ठेवले जाते त्यांच्या खाण्यावर।

चीनी लोकांच्या खाण्याबद्दल एक म्हण खूप प्रसिद्ध आहे

" चीनी लोक सर्व चार पाय असणाऱ्या गोष्टी ( खुर्च्या अणि टेबल सोडून ), सर्व उडणाऱ्या गोष्टी (हेलीकॉप्टर अणि विमान सोडून ) अणि सर्व पोहणारे जीव ( सबमरीन सोडून ) खातात ".

वाचायला किंवा ऐकायला गंमत वाटेल पण ते समजून घ्यायचे असेल तर त्याच्या इतिहासात शिरणे गरजेचे आहे।
विस्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे " Longer you look back, farther you can look forward". 

तो इतिहास आहे चीनी क्रांतीचा , Mao  च्या वलयांकित नेतृत्वाचा , साम्यवादी विचारधारेचा अणि  महासत्ता बनण्यासाठी घेतलेल्या अणि चुकलेल्या  धोरणात्मक  निर्णयांचा  व त्यातून निर्माण झालेल्या जगण्यासाठीच्या संघर्षाचा।  हा इतिहास एकदा समजला की या खानपानाच्या सवयीचा  राजकीय , धार्मिक , आर्थिक  अणि सामाजिक अशा चौकस दृष्टिकोनातून आढावा घेणे सोपे जाईल। 

रिपब्लिकचा  उदय 

१९१२ मध्ये "Qing " घराण्याचा अस्त झाल्यानंतर "रिपब्लिक ऑफ़ चीन " जन्माला आले पण  खऱ्या अर्थाने १९२८ साली त्याला एकसंध राष्ट्राचे रुपडे दिले ते " चीन नॅशनल पार्टी " व त्याचा म्होरक्या "जनरल चिआंग के -शेक " याने।  पण तरीही " आहे रे " वर्गाचे प्रतिनिधि असणारे सरंजाम ( Landlord ), " नाही रे " वर्गाचे प्रतिनिधि म्हणजे शेतमजुर किंवा कष्टकरी , त्यांचे राजकीय नेतृत्व करणारी " कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ चीन " अणि " वसाहतवादी महत्वकांक्षेतून चीनचे लचके तोडणारा जपान " अशी बरीच विसंवादी पात्रे या महानाट्यात आपा पले योगदान देत होतीच।  दुसऱ्या महायुद्धातील जपानची शरणागती , चिनमधील सामाजिक यादवी युद्ध(Civil war )  याच्या पार्श्वभूमीवर गाजलेला प्रस्थापित राजवटीविरुद्धचा (चिआंग के -शेक) लढा , " लॉन्ग मार्च " अणि " गनिमी युद्ध डावपेच " म्हणुन " माओ  जेडोंग " क्रांतिकारक नेता म्हणून उदयाला आला।  त्याची परिणीति म्हणजे  १९४९ मध्ये " People's Republic of China"  किंवा " Red China " जो आपण " Mainland China" म्हणून पण ओळखतो तो उदयाला आला । अर्थातच त्याचा सर्वेसर्वा होता  " माओ जेडोंग ".

महासत्तेचे स्वप्न 

साधारणपणे  अशा क्रांतिकारक नेतृत्वाची एक शैली असते : वर्षानुवर्षाची गुलामगिरी , "नाही रे " वर्गाची झालेली पिळवणूक  याचा बदला घेण्याची , " आहे रे " वर्गाला  धड़ा शिकविण्याची  भावना चेतवायची , त्याला मस्त पैकी "राष्ट्रवादाची " फोडणी द्यायची अणि एक देशव्यापी चळवळ उभारून आपणच लोकनायक किंवा मसीहा असे काहीसे चित्र निर्माण करायचे। त्यासाठीचे गाजर म्हणजे अर्थातच  सुखी आयुष्याचे स्वप्न। 

माओ जेडोंग  ने पण हीच मळलेली वाट पकडली।  त्याचा वैचारिक आधार होता " साम्यवाद " ,लक्ष्य होते " चीनला महासत्ता बनविण्याचे"(  केवळ १५ वर्षात तत्कालीन महासत्ता असलेल्या ब्रिटेनला अणि नंतर अमेरिकेला मागे टाकण्याचे) व आव्हान होते जगाच्या २०% लोकसंख्येला साथ घेऊन कृषिप्रधान देशाला औद्योगिकी करणाच्या  प्रवाहात लोटायचे।  आपल्याकडे झालेल्या " कुळकायदयाच्या " धर्तीवर  चीनमध्ये पण सरंजाम लोकांकडून जमीन हस्तगत करून ती सामान्य शेतकरी किंवा मजूर यांच्याकडे दिलेली होती।  सामान्य लोक खुश होते अणि अर्थातच "माओ जेडोंग " आता वलयाच्या शिखरावर होता। साम्यवादी असल्यामुळे त्याची वैचारिक पंढरी होती " रशिया(USSR ) " अणि विठ्ठल  म्हणजे " स्टालिन ". 

धोरणात्मक  निर्णय / ऐतिहासिक चूका :
  • रशियाच्या मार्गदर्शनाखाली अणि आर्थिक मदतीच्या जीवावर( कर्ज )  माओने पूर्ण देशच बांधायला काढला।  रस्ते , पूल , बंदरे अशा पायाभूत सुविधा , कालवे , बोरवेल असे सिंचन प्रकल्प , पोलादाचे कारखाने  अशी घोड़दौड़ सुरु केली।  रशियन तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली  अनेक औद्योगिक प्रकल्प उभे राहिले। 
  • "खासगी मालमत्ता " ही संकल्पना संपुष्टात आणून  सर्व मालमत्ता , शेतजमीनी सरकारी मालकीच्या केल्या। 
  • पारंपरिक शेतीतून येणारे धान्य रशियाचे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे नव्हते  म्हणून " Collectivism " च्या नावाखाली कम्यून  शेतीची संकल्पना राबविली गेली।  ५० ते २०० कुटुंबाचे एक कम्यून  निर्माण झाले।  सामूहिक शेतीचा उदय झाला।  कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते या कम्यूनला मार्गदर्शन करू लागले। 
  • स्रीला पिढ्यांपिढ्यांच्या "चूल /मूल " मानसिकतेतुन बाहेर काढून समान अधिकार दिले।  आता हे सर्व लोक माओसाठी " Human Resource " होते। 
  • त्यामागची कल्पना अशी होती की  सरकारच्या नियंत्रणाखाली , कोणती पिके घ्यायची किंवा  जास्त उत्पादन येण्यासाठी काय उपाय करायचे हे ठरविणे सोपे जाईल।  अर्थातच त्यामागचा एक उद्देश्य रशियाचे कर्ज फेडणे होते।  त्यासाठी  "भाज्या किंवा फळे " याची शेती बंद करून तांदुळ /गहू शेतीला प्रोत्साहन दिले गेले।  मातीचा पोत किंवा कुठे काय पिकेल याचा फारसा विचार झाला नाही।  उत्पादन वाढविण्यासाठी किटकनाशके , खते मोठ्या प्रमाणात वापरली गेली। 
  • आता "कम्यून " मध्ये स्पर्धा लावल्या गेल्या की एका एकरात जास्तीत जास्त किती पिक काढता येईल। २५० किलो एकर पासून सुरुवात करत हे आकड़े १०००० किलो एकरी इतके फुगविण्यात आले। 
  • जितके उत्पादन त्याचा काही भाग शेतकरी अणि त्यांचे कुटुंब यांच्यासाठी ठेऊन बाकीचे सरकार दरबारी जमा करावे लगत असे।  आता गोची अशी झाली की  उत्पादन इतके फुगवून दाखविले असल्यामुळे त्याच्या प्रमाणात धान्य सरकारने   उचलले।  प्रत्यक्षात खुप कमी उत्पादन झाल्याने सर्वच्यासर्व पिकलेले धान्य सरकार दरबारी जमा झाले।  शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। 
  • उत्पादन वाढीचा हव्यास अणि झपाटलेपण इतके होते की  चिमण्या , उंदीर , किडे  शेतातील धान्य खातात म्हणून  त्यांना मारण्याची मोहिम सरकारी आशीर्वादाने हाती घेतली गेली। चिमणी सरासरी ४. ५ किलो धान्य फस्त करते (?) अणि म्हणून अक्षरशः मोठे आवाज करून , चिमण्यांना थकवून , किंवा पकडून किंवा बन्दुकीने मारून टाकले। १०,०० ,००० चिमण्या याच्या बळी पडल्या। 
  • निसर्गावर हे पाहिले आक्रमण होते "नैसर्गिक साखळीतील महत्वाचा दूवा " निखळला।  चिमण्या पिकाबरोबर कीडे , अ ळया , नाक तोड़े  खातात त्यामुळे पिकांवर रोग/ कीटन पसरत नाही , तो दूवा निखळल्यामुळे , उभी पिके बसली।  उत्पादन अजून कमी झाले।  वर सांगितल्याप्रमाणे सरकार दरबारी आकड़े फुगवून सांगितले जात असल्यामुळे , शेतकरी अजून वाइट परिस्थिति अणि भूकमारी मध्ये ढकलला गेला। 
  • हे कमी म्हणून की काय १९६० मध्ये प्रचंड पूर आल्याने ग्रामीण चीन अणि त्याची अर्थव्यवस्था इतकी खंगावली की  या भूकमारी अणि दुष्काळात ३. ५  करोड़ लोक मरण पावले। त
या धोरणात्मक निर्णयाला  नाव होते " The Great Leap Forward( 1958-61)" अणि ऐतिहासिक चुकांवर पांघरूण घातले गेले  ते " Three Years of Natural Disasters( Famines)" या नावाने। याला राष्ट्रवादाची फोडणी दिली गेली ती  म्हणजे  " माझ्या देशाचा अणि चीनी लोकांचा अपमान सहन केला जाणार नाही ". पण त्यामध्ये हौतात्म्य पदरी आलेल्या ३. ५ करोड़  चीनी  लोक कुणाच्याच खिजगणतीत नव्हते। 

जीवन संघर्ष अणि अन्नसुरक्षा : 
  • जमिनीचा पोत न पाहता उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी राबविलेली चुकीची धोरणे , किटकनाशके अणि खते यांचा अनिर्बंध वापर  यामुळे  शेती व्यवसायाची वीण उसवली गेली।  उत्पादन क्षमतेला चांगलाच तडाखा बसला( चीनमध्ये २०% जागतिक लोकसंख्या होती  अणि शेतियोग्य जागतिक जमीनपैकी फक्त ७ % जमीन होती )
  • फ ळे किंवा  भाज्या  "बूर्ज्वा  म्हणजे (सरंजाम ) लोक खातात म्हणून त्याची शेती बंद करण्यात आली। साम्यवादासाठीची ती छोटी आहुती होती।  
  •  दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणारे औद्योगिक प्रकल्प यामुळे शेतजमीन अजून कमी होत गेली 
  • तरुण लोकांनी शहरात स्थलांतर केल्याने , शेतात कसायला लोक पण कमी होत गेले 
  • दुसऱ्या बाजूला १९६० मध्ये  खायला अन्न नाही म्हणून " चिखल " खाउन पोट भरताना गतप्राण झालेल्यांच्या आठवणी पण तशा ताज्या होत्या। 
  • यातूनच किमान जीवंत राहता यावे अणि काही जोड़ धंदा मिळावा म्हणून ग्रामीण चीनमध्ये  डुक्कर / कासव यांच्या  पैदासीला  परवानगी मिळाली। 
  • त्याचमुळे पुढे भात किंवा नूडल्स या चीनी लोकांच्या स्टेपल फ़ूड बरोबर पोर्क मीट हा अविभाज्य घटक बनला। प्रथिनांचा मुख्य  पुरवठा करणारा अन्नघटक बनला। जीवो जीवस्य जीवनम : हा जगण्याचा मूलमंत्र बनला। 
संघटिक पशुपालन उद्योग :  वन्यजीव पालन कायदा / Wet Markets 

  • परस्पर लोकांच्या खाण्याचा प्रश्न सुटतो आहे  म्हटल्यावर सरकारने पण त्याकडे फारसे लक्ष्य दिले नाही। त्यामुळे घरच्या अंगणात चालणाऱ्या या पशुपालन व्यवसायात  बदक , कासव ,  डुक्कर , कोंबडी यांची पैदास सुरु केली 
  • लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता संघटिक श्रेत्रातील कंपन्यांनी यात रस घेणे चालू केले अणि  पोल्ट्री , पिग्गेरी , डक मीट प्रोसेंसिग या धंद्यावर कब्ज़ा मिळविला। 
  • साहजिकच छोटे असंघटिक शेतकरी  यांनी  ससे ,साप , उदमांजर , मरमोट ( खार ) यांची पैदास सुरु केली 
  • एकीकडे ओद्योगिकीकरण जोरात असताना व शेतीचा कणा मोडलेला असताना , लोकांना जोडधंदा म्हणून अधिक प्राणी पाळता यावेत म्हणून १९८८ मध्ये सरकारने " वन्यजीव संरक्षण कायद्यात " सुधारणा केली अणि त्यांना "Natural Resources( नैसर्गिक साधनसंपत्ति ) म्हणुन घोषित केले।  साहजिकच माणसाच्या भल्यासाठी त्यांचा उपयोग करण्यासाठी आता कायद्याने परवानगी मिळाली। 
  • त्यामुळे संघटिक पशुपालनच्या नावाखाली  अस्वल , Sea Cucumber , साप , कोल्हा यांची फार्म्स उभारली गेली। २०००० अशी फार्म्स साध्य कार्यरत आहेत। ५४ प्रकारचे वेगवेगळ्या प्रजाती येथे आहेत। 
  • त्याचेच पुढचे पाउल म्हणजे " Wuhan " किंवा इतरत्र आढळणारे "Wet Markets ". 
  • साहजिकच तस्करी अणि चोरट्या मार्गाने दुर्मिळ प्राणी पण या मार्केट मध्ये येऊ लागले।  त्यात प्रामुख्याने होते पैंगोलिन , फ्रूट Bats , वाघ ,राइनो  इ। 
या सर्व उद्योगची सध्याची उलाढाल आहे ७० बिलियन डॉलर्स।  हा उद्योग प्रामुख्याने मांस अणि औषधांसाठी केला जातो। चोरट्या मार्गाने दुर्मिळ प्राणी गोळा करण्याचा उद्योग आहे २३-३०  बिलियन डॉलर्स। हा पसारा  चिनी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत खूप छोटा आहे ,पण... ?

या पण मध्येच या  जीवघेण्या  तरीही जोरात चालणाऱ्या उद्योगाचे रहस्य दडले आहे। 

चिनी संस्कृती व समाज : 

वसंत ऋतु आगमन व सुगीचा हंगाम  यांचे स्वागत करण्यासाठी नवीन वर्ष साजरा करण्याची जगभर प्रथा आहे।  आपला जसा गुढीपाडवा तसाच  चीनी लोकांचा " Lunar New Year Festival ".  फटाके वाजवून आनंद व्यक्त करणे , कुटुंबासोबत जेवण घेणे , एकमेकांना भेटवस्तू देणे अणि सर्वात महत्वाचे म्हणजे  खूप चांगले चांगले पदार्थ करणे।  या नववर्ष दिनी काही गोष्टी खाणे शुभ मानले जाते।  त्यामध्ये  प्रामुख्याने मासा (समृद्धीचे प्रतीक), डम्पलिंग (चिरतारुण्याचे प्रतिक ),  स्प्रिंग रोल (संपत्तीचे प्रतीक ), राइस बॉल्स ( उत्कर्षाचे प्रतीक ), Longevity नूडल्स( चिरतारुण्याचे प्रतिक), Fortune Fruits ( नशीबाचे प्रतीक ) यांचा समावेश होतो।  

यातून तुम्हाला लक्षात येईल की  अन्न  हे फक्त " उदरभरण " नसून  ते चिरतारुण्य अणि समाजातील आपल्या स्थानाचे प्रतीक आहे। भुकमारीचा  इतिहास  असेल किंवा  सांस्कृतिक कल म्हणा चीनी माणूस आपल्या खाण्याला खूप गंभीरतेने घेतो।  " तुम्ही काय खाता यावरून तुम्ही कोण आहात हे ठरविले जाते ". या मध्येच त्या  वरच्या  पण.... ? " चे उत्तर दडले आहे।   

अशी सुपीक जमीन असल्यावर " वन्य जीव मांस " विकणाऱ्या उद्योगाचे पीक मुबलक येणारच।  त्याचे मार्केटिंग जर आपण चिरतारुण्य टिकविण्यासाठी अणि वैद्यकीय फायदयासाठी केले  तर मग  विचारायलाच नको। 

Wild Animal
Delicacies
Health Benefits
Pangolin
Pangolin Blood Fried Rice-Meat
Pangolin scale Stew -Meat

Rich Protein Source
Reduce Swelling
Increase Lactation
Reduce Swelling
Increase Rapacity
Sea Cucumbers
Soup-Meat
Weight loss
Rich Protein Source
Increase Sexual Libido
Cardiovascular Diseases reduction
Reduce heart attack Risk

Fruit Bat
Stew/Soup-Meat
Vision Improvement
Increase Sexual Libido
Civet Cats
Soup/Roast-Meat
Rich Protein Source

Bear
Bear bile - Medicine
Digestive system improvement


वरील टेबल वरून आपल्या लक्षात आले असेल की  चिनी धनदांगडे  या  वन्य जीव मांस खाण्याचे का शौकीन आहेत।  यातील नावीन्य त्यांना " Social Bragging " ची  मुभा  देतात अणि त्याचे वैद्यकीय फायदे  चिरतारुण्य। थोडक्यात हा  मुठभर श्रीमंतानी त्यांच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी ग्रामीण चिनी कामगार वर्गाला हाताशी धरुन चालविलेला , सरकार दरबारी वजन असणारा खेळ आहे। 

चिनी समाज : धर्म 

साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की   भूक , तहान, मैथुन  या नैसर्गिक गरजा भागविल्यानंतर स्वखुशीने काही बंधने स्वीकारून  मनुष्यप्राण्याला समूहचा भाग  बनविणारे जे घटक असतात त्यातील धर्म  या महत्त्वाच्या घटकाची या सर्वाबाबतची भूमिका काय ?

तसा चीन हा बौद्ध धर्मियांचा देश ,पण  मुलत: चीनी समाज हा धार्मिक गणला जात नाही।  त्यातच " धर्म ही अफूची गोळी आहे , त्यामुळे त्यापासून दूर राहणे चांगले " ही साम्यवादी शिकवण।  यामुळे  बाकी धर्मात येणारी धार्मिक बंधने तितक्या प्रभावीपणे चीन मध्ये दिसत नाहीत। गोमांस हिन्दू धर्मियांना  वर्ज्य , तर पोर्क मीट  मुस्लिम समाजाला हराम , अशी विभागणी चीनमध्ये नाही।  हलालची संकल्पना नसल्यामुळे "  LIVE WET Market"ला  देखील चीनी लोकांची मनाई नाही। 

असा सर्व उहापोह झाल्यानंतर  साहजिकच  यातून पसरणाऱ्या विषाणूंचे नियंत्रण करायचे कसे  हा मुद्दा जागतिक महत्वाचा बनला आहे।  वर उल्लेख केलेले सर्व वन्य जीव पिंजऱ्यामध्ये एकावर एक ठेवले जातात त्यांची लाळ , रक्त , पस  यातून हे जंतु एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात अणि मग माणसात पसरतात।  पिंजरात असल्याने भेदरलेल्या या प्राण्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते कारण ते तणावाखाली असतात  व सहजपणे ते जंतु वाहक बनतात। 

साहजिकच  सहजीवनाचा आनंद सोडून ओरबाडण्याचे सुख घेणाऱ्या मानवाला निसर्गाने दिलेला हा ईशाराच। नुकताच अंतरराष्टीय महिला दिन साजरा झाला त्याची थीम होती  " EACH FOR EQUAL ". निसर्ग कदाचित त्याचीच अपेक्षा करतोय आपल्याकडून , प्रश्न असा आहे  आपण या अपेक्षेप्रमाणे वागू का  ?

नाहीतर  " Food  Is  Heaven " म्हणणाऱ्या चिनी लोकांना  समजविण्यासाठी म्हणावे लागेल :

वदनि पैंगोलिन घेता / नाम घ्या  त्या निसर्गाचे 
सहज स्मरण करावे / आपुल्या वन्यजीवांचे 
करुनी  स्मरण त्यांचे / अन्न त्यागा खुशाल 
उदरभरण नाहीं/ शौक करण्या खुशाल /


  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...