Saturday 2 February 2019

 चंदा  रे........ चंदा रे ......... 

मागील आठवड्यामध्ये कामा निमित्त  मीटिंगला जात असताना  मुंबईत आता दुर्मिळ होत चाललेल्या " सिंगल स्क्रीन " चित्रपटगृहावरुन  पुढे आलो  आणि गाडीतील रेडिओवर लागलेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवर  मन एका वेगळ्याच आठवणी मध्ये रमून  गेले। साधारण १९९७-९८ चा काळ। "मेरे ख्याबों  में जो आये , आके मुझे तड़पाये " असे म्हणत  खरे तर आमच्याच स्वप्नात धुमाकूळ घालणाऱ्या काजोल च्या  चित्रपट कारकीर्दीच्या  बहराचा काळ। विसाव्या शतकात  ४५ -५० कोटीचा  गल्ला ( Inflation adjusted भाषेत बोलायचे तर आजच्या काळात  ३०० कोटीचा  विक्रम करणारे )जमविणारे जे मोजके ३ चित्रपट  ९० च्या दशकात  पडदयावर  आले  त्या पैकी २ चित्रपटात नायिका होती काजोल। "कुछ कुछ होता है " म्हणत ही दुह्लनिया दिलवाल्यांच्या दिलावर राज्य करत होती।  साहजिकच तिच्या आगामी  चित्रपटांबद्दल  त्या काळात उत्सुकता असणे  स्वाभाविक होते। अश्यातच  तिचा " सपने" नावाचा  मू ळ  " मिनसारा कनवू " या  तमिळ  चित्रपटाचा रीमेक१९९७ मध्ये प्रदर्शित झ ा ला।   यात आकर्षण होते ते अजून एका कलाकाराचे ; "प्रभुदेवा अणि त्याच्या नृत्याचे ". (हो हो तोच इंडियन मायकेल जैक्सन। . हे म्हणजे " वड़ा पाव " हा इंडियन बर्गर आहे। . हे जे काय  असते ते तसेच ! !) साहजिकच हा  चित्रपट जवळच्या सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये  आवर्जून पाहिला।  काजोलच्या प्रेमपोटी म्हणा  किंवा माणूस असा नाचूच कसा शकतो या  आश्चर्यापायी   म्हणा, चित्रपट पाहून काढला। 

१९९७-९८ तो काळच  तसा मंतरलेला होता।  खा उ जा ( खाजगीकरण , उदारीकरण  अणि जागतिकीकरण ) संस्कृती आता भारतात बा ळ से  धरु लागलेली होती। प्रगतीची  ,चांगल्या जगण्याची स्वप्ने पडू लागलेली होती।  पक्षी जसा पिंजऱ्यातून बाहेर काढल्यावर  स्वैर भरारी घेतो तशीच काहीशी अवस्था  लोकांची झ ाली होती।  जागतिकीकरणाने पूर्ण जगच आपला रंगमच वाटावा इतक्या अमाप संधीची कवाड़े खुली होत  होती. 
"Deferred Gratification"  ते " Instant Gratification" हे बदललेले  आजचे जीवनसूत्र जन्माला आले ते याच सुमारास।  सुखमय जीवनाची व्याख्या भौतिक सुखांच्या पार्श्वभूमीवर करायचे ठरविले तर "स्व:ताच्या मालकीचे घर ", "हम दो  हमारे दो  यांना सामावू शकेल अशी चार चाकी गाड़ी ","कुटुंबाला घेऊन वर्षातून एखादी  देश विदेशातील लांबची सहल " अणि "आदर्श पती बनण्यासाठी लागणारी दागिने खरेदी" या चतुःसुत्रीचा उल्लेख करावा लागेल।  काटकसरीने संसार करुन  आयुष्याच्या संध्याकाळी जमेल तेवढी  भौतिक सुख उपभोगायची (Deferred Gratification) हा विचार मागे पडून  "या सुखांनो या " ऐसे म्हणत उधारीवर ( Credit) का होईना पण सुखांना आलिंगन देण्याची  आणि  जगण्याचा आनंद हा "आज आत्ता  इथे "(Instant Gratification)  घेण्याची प्रथा रूढ़ झ ा ली। अश्या स्वप्नाच्या दुनियेचा अजून एक नियम असतो की ती स्वप्ने दाखवून , तुम्ही पण ती पूर्ण करू शकता असे सांगणारा एक ड्रीममर्चेन्ट जरुरी असतो। अर्थातच त्या काळ ा तला ड्रीममर्चेन्ट  होता " कुंदापुर वामन कामत (K V Kamath)! आईसीआईसीआई बैंक (ICICI Bank) या पायाभूत क्षेत्राशी निगडित  कर्जवाटप करणाऱ्या बँकेचा प्रमुख !. आज ज्याला आपण "ग्राहक बैंकिंग (Consumer Banking) म्हणतो त्याची मुहूर्तमेढ रोवणारा बैंकर म्हणजे K V Kamath.   स्वप्ने दाखवून ती पूर्ण करण्यासाठी बाजारात आलेले वेगवेगळे उधारीचे  प्रकार म्हणजे  ग़ृह कर्ज , मोटर कर्ज , दागिने घेण्यासाठीचे कर्ज , क्रेडिट कार्ड  इत्यादी।  आज सगळीकडे उपलब्ध असणारे हे बैंकिंग कर्जाचे प्रकार  ही प्रामुख्याने खासगी आणि परदेशी बँकांची अपत्ये , पण आईसीआईसीआई बँकेने या अपत्यांना दत्तक घेऊन प्रचंड मोठी भारतीय बाजारपेठ खुली करुंन दिली आणि स्वप्ने सत्यात उतरु लागली। 

 या  कामत साहेबांच्या फॅक्टरीमधून एका पेक्षा एक असे  सरस बैंकिंग प्रोफेशनल तयार झा ले  ।  शिखा शर्मा  ( माजी एक्सिस बैंक प्रमुख ), कल्पना मोरपोरिआ ( जे पी  मॉर्गन  इंडिया च्या प्रमुख), वी  वैद्यनाथ ( कैपिटल फर्स्ट IDFC बँकेचे होणारे प्रमुख ) अणि अर्थातच  चंदा कोच्चर। 

चंदा कोच्चर यांचा " मैनेजमेंट ट्रेनी " ते  "बँकेच्या प्रमुख" हा  प्रवास खरे तर थक्क करुन  सोडणारा। कामत साहेबांच्या नंतर तितक्याच समर्थपणे बँकेची  जबाबदारी त्यांनी पार पाड़ली। " पायाभूत सेवांशी निगडित प्रोजेक्ट फाइनेंस " आणि " कंस्यूमर बैंकिंग " या दोन अत्यंत भिन्न अश्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाड़ल्या। (  हे म्हणजे  फाइव स्टार होटल मालकाने;   उपहारगृह पण  तितक्याच ताकदिने चालविल्यासारखे आहे जे   निश्चितच  सोपे नाही। )

मग "चूल आणि  मूल " या मानसिकतेतून बाहेर पडून आभाळाला गवसणी घालण्यासाठी निघालेल्या तरुण मुलींना त्या" रोल मॉडल " वाटल्या यात नवल ते काय ? "मग त्या कश्या चांगली साडी नेस तात " , " कामात गडलेल्या असून सुद्धा आपल्या कुटुंबा ला  कसा छान वेळ देतात " या टिपिकल "भक्तसम्प्रदायवाचक " प्रतिक्रिया चालू झ ाल्या। बघता बघता  त्यांचा प्रवास हा त्यांना "अढळ पद बहाल केलेल्या नायकाकडे "  घेऊन गेला " 
जगभरातून मिळणारे मा न -सन्मान ,  वित्त दुनियेतील अग्रणी नियतकालिकात मुलाखती, शक्तिशाली जागतिक महिलांमध्ये समावेश   यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले। 

अचानक एखादे स्वप्न भंगावे  किंवा एखादा दगड लागुन या प्रतिमारूपी नायकत्वाला तडा जावा असे  काही तरी घडले।  

आपल्या पतिशी निगडित कम्पनीला कर्ज वाटप आणि मंजूरी प्रकरणात आपण  सहभागी  न होता   बाकी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  एकत्र बसून योग्य तो बँकेच्या हितसम्बधाना बाधा येणार नाही असा निर्णय घ्यावा  हा  " व्यावसायिक सचोटि "  किंवा "  अधिकार पदावर असताना  पा ळा य च्या  व्यवहारसूचितेचा  " राजमार्ग ठरला असता।  पुढे श्री कोच्चर यांची गुंतवणूक असणाऱ्या कंपनीचा प्रवर्तक बॅंकेकडून कर्ज घेताना ते मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा घटक असणे हीच  ती कोच्चर बाईं ची चूक।  बर यात गैरव्यवहार काही झ ा ला का तर नाही  पण सार्वजनिक जीवनात वावरताना,  वित्त क्षेत्रात काम करताना जी साधनसुचिता अपेक्षित असते त्याचा भंग झ ा ला। 
अश्या कर्जमंजुरीचा निणर्य  एकट्या कोच्चर बाईंनी घेतलेला  नहीं,पण त्यावेळी बाकी अधिकारी मूग गिळून गप्प का बसले असे कर्ज देणे बरोबर नाही किंवा अधिक छाननी (Due Diligence) ची गरज आहे असे कोणी का सांगितले नाही। कारण त्यावेळी कोच्चर यांची अढळ पद बहाल केलेल्या नायकाची " प्रतिमा।  बँकेच्या एका शेअ रहोल्डरने  केलेल्या तक्रारीमुळे अणि "   इंडियन एक्सप्रेस "  नियतकालिका ने  लावून धरल्यामुळे  देशातल्या तपास यंत्रणे ला  याचा पाठपुरावा करावा लागला  आणि  काल  पर्यन्त " चरित्राचे " सर्टिफिकेट देणारे व   कोच्चर बाईं पाठीमागे ठाम पणे उभे राहणारे कार्यकारी मंडल (Board of Directors) त्यांच्या चरित्र हननाच्या मागे लागले।  त्यांचा राजीनामा हा त्यांचा बडतर्फी मध्ये परिवर्तित करण्यात आला  व त्यांचे भत्ते , बोनस  वैगरे मिळून सुमारे १०  कोटि  व  त्यांच्या मालकीच्या समभागाचे मूल्य सुमारे २०० कोटी  असे त्यांच्याकडून वसूल केले जाईल असे घोषित केले गेले  अणि कोच्चर बाईं च्या खलनायकरूपी प्रतिमा उभारणीला प्रारंभ झ ा ला। 

व्यावसायीक सचोटीचे पालन केले नाही म्हणुन बडतर्फी  ही  शिक्षा योग्यच!  
पण भत्ते  बोनस रुपाने मिळविलेले पैसे वसूल करणे म्हणजे "आम्हीच आधी शेण खाल्ले  पण आता कसे आम्ही सोवळे "  हा  दाखविण्या चा केविलवणा प्रयत्न  नव्हे काय ? 

या घडामोडी नंतर  "  नवा गड़ी नवे राज्य " या प्रघाताप्रमाणे पुढील कामकाज चालू होईल।  नवा मसीहा जन्माला येईल  आणि प्रतिमा भंजन होई पर्यन्त पुढचे खेळ चालू राहतील।  

अचानक भानावर आलो  आणि "सपने" चित्रपटातल्या  गाडीत सुरु असलेल्या  गा ण्याचे बोल मनात रुंजी घालत होते। 

"चंदा रे  चंदा रे कभी तो जमीं पे आ , बैठेंगे बाते करेंगे !
तुज़को आते इधर लाज आये अगर , ओढ़ के आजा तू बादल घने !"

कोच्चर बाईं , बँकेचे कार्यकारी मंडळ अणि  तपास यंत्रणा  या तिन्ही घटकांची "मन की बात " च तर हे गाणे सांगत  नाही ना ! 



  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...