Saturday 30 March 2019

                                                                        ताई आई

विदाशास्त्रज्ञांच्या मतानुसार ( Data Scientist)  आपण सर्वसामान्य माणसे साधारणपणे आपल्या जीवनात १०० ते १५० लोकांना ओळखत असतात।  त्यांचाशी आपला परिचय असतो।  शिष्टाचाराची  घडी मोडून त्यातील १५ ते २० लोकांबरोबर  आपण गप्पाटप्पा करतो, रस्त्यात कुठे भेटलो की आवर्जून विचारपूस करतो। "कसे काय , बर चालले आहे ना !" अशा  स्वरूपाचा संवाद आपल्या परिचयाचा असतो।  या सर्व लोकसंग्रहात  घट्ट मैत्री , हितगुज करण्यासाठीचा गोतावळा  मात्र ५ ते ७  जीवनयात्रींच्या पुढे फारसा जात नाही।
हा गोतावळा म्हणजे जिथे प्रत्येक जीव खुलतो , रुसतो , हसतो।  आपली भयभीति , आपली सुखदुःखे , आशा आकांक्षा या मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी हे  "Inner Circle" ( गोट ) माणूस आपल्याभोवती गुंफतो। साहजिकच या गोटात आपल्या नात्यातील , भावकीतील  लोक असतात।  पण त्यांच्याबरोबरीने आपल्या रक्ताची नसून देखील जन्मजन्मांतरीचे ऋणानुबन्ध असल्यासारखे आपल्यावर प्रेम करणारी सच्चे जीवनसाथी देखील असतात।  कसोटीच्या क्षणी आत्मविश्वास , कठिण काळात धीर  अणि आनंदाच्या क्षणी कौतुकाची थाप अगदी सहज देऊन मोकळे होतात।  वाढदिवसाच्या शुभेच्छा  असो किंवा दुखण्या खुपण्याच्या वेळेची विचारपूस असो , ही माणसे अखंड आपल्या सोबत असतात।

आमचे  एकत्र कुटुंब असल्यामुळे  आजी , आई-बाबा , काका-काकू , बायको  या नंतर  माझ्या  गोटातील (Inner Circle) मधील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे " श्रीमती शुभदा श्रीहरी छत्रे " अर्थातच " ताई आई ".

५ फुट ४ इंचाच्या आतबाहेरची उंची , ताम्बुस गोरा रंग , शिडशिडीत बांधा , अंगावर सुती साडी , व  " नुकतीच बापट बाल शाळेतून लहान किंवा मोठ्या गटाला शिकवून( आजच्या काळातील "pre-primary") परतली आहे अशी देहबोली , म्हणजे आमची  "ताई आई ". साडीचा पदर उजव्या हाताने खांदयावर सावरण्याची  लक़ब , चेहऱ्यावर कुतूहल आणि आपुलकी यांच्या मिश्रणातून होणारे भाव घेऊन " तुम्हाला सांगते पप्पूची आई " असे म्हणत  ताई आई ने घरी गप्पांचा अड्डा जमविला की  घर बसल्या सांगलीतील सगळ्या बातम्या कळायच्या। गप्पांच्या मध्ये दाद देताना " हात  तोंडावर घेऊन मानेला छोटासा झटका देऊन  गड़गड़ाटी हसण्याची लक़ब तर विरळाच। स्मितहास्य असले प्रकार तिच्या प्रकृतिला काही मानविले नाहीत।

"ताई आई " ही माझ्या आयुष्याचा भाग कधी बनली  हे मला तरी काय आठवत नाही , ती मात्र अगदी मुहूर्त लक्षात असल्यासारखा मला सांगायची की " अरे लहानपणी शाळेला जाताना तू  भोकाड पसरलेस की आमचा दादा ( मनु दादा अर्थातच "देवदत्त छत्रे ") किंवा  राणी ( ताई  म्हणजे  अपर्णा छत्रे ) तुला आमच्या घरी घेऊन यायचे  ,  खेळविण्यासाठी म्हणजे तुझे रडणे बंद । "  असा हा सगळा रोकटोक मामला। खरच आहे म्हणा ते।  " ताई आई " चे घर म्हणजे आम्हा मुलांचा उन्हाळाच्या सुट्टीतील अड्डाच। ते  घर म्हणजे आमच्यासाठी "OYO" Rooms सारखेच , जिथे  आम्ही खरच "On Your Own" असायचो। सकाळच्या खाण्यापासून दुपारच्या कोको पर्यंत  आम्हा बालगोपालांचा  मुक्काम "ताई आई " कडे ठरलेला।  हे अन्नसंस्कार मला फार महत्त्वाचे वाटतात।  " उसळ  किंवा भाजी " बरोबर फरसाण खाण्याची सवय मला लावली ती " ताई आई अणि ताई बाबांनीच."  पुढे ऑफिसमध्ये लक्षात आले की मारवाड़ी लोग जेवणात "नमकीन" खातात।  माझ्यासारख्या चित्पावनाला ही "वैश्यवृत्तिच्या  " खाद्यसंस्कृतिची   लहानपणीच  परिचय करून देणारी मास्टर शेफ म्हणजे ताई आई. दूसरी अणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे " Cocoa". "कोको  हे पेय मी परवा परवा पर्यन्त फक्त ताई आईकडेच प्यायलेलो आहे।  जागतिक पातळीवर आजकाल "Cocoa Drinking Games" खेळले जातात कारण त्यातुन "Cocoa "चे  चांगले आरोग्यदायी गुण सगळांना समजतील जसे की " प्रतिऑक्सिडिकारक( antioxidant) , रक्ताभिसरणपोषक ( Improve Blood Flow, reduce Clot formation) , रक्तदाब नियंत्रक ( Control Blood pressure) इत्यादि " त्यामुळे सध्या मोठ्या मोठ्या "Coffee Houses" मध्ये स्पेशल "Cocoa Flavored Drinks" ठेवली जातात। बर " Cocoa" पिण्यासाठी ती चव जीभेवर बसविणे फार महत्त्वाचे।  ते काम   ताई आई ने  आमच्या लहानपणीच करून घेतलय।

जो प्रकार खाण्याचा बाबतीत तोच वागण्याचा बाबतीत। " मुस्सदीपणा"किंवा "हातच राखुन  बोलणे " वैगरे शहरी प्रकार तिला कधी मानविले नाहीत। जे काही आहे ते थेट कुणाचा आडपडदा न ठेवता।  " म्हणजे  मी  मला MBA नंतर नोकरी लागली म्हणून सांगायला गेलो" किंवा "दरवर्षी दिवाळीला सांगलीला गेल्यावर तिला भेटलो की  गप्पा व्हायच्या"।  ताई किंवा दादा  मला मग काम काय करतोस  किंवा किती तास काम असते, तुझी पोस्ट काय आहे   वैगरे  साधारण प्रश्न विचारायचे।" "ताई  आई  नेहमी  थेट भिडायची  अणि  म्हणायची अरे ते जाऊ दे , पैसे वैगरे किती मिळतात  अणि मग ते सांगितल्यावर  तिच्या चेहऱ्यावर जी कौतुकाची अणि अभिमानची मुद्रा यायची तेव्हा  खरच वाटायच  की " I am arrived in life." अणि त्यांनतर त्या आनंदात ती मला पूर्ण सांगली दर्शन घर बसल्या घडवून आणायची।

मग ते चौकातील कार्नर वरील तिचे घर आमचा "Gossip Corner" असायचा।  " अरे तुला  सांगते  पप्पू , त्या जोश्यांच्या  प्रभुने  फराळाचे  १०० किलोची आर्डर घेतली" पासून " आपटे यांच्या मुलीचा काणेंच्या मुलाशी लग्न ठरले पण , ती पोरगी  वस्ताद निघाली रे... " पर्यन्त  सर्व गॉसिप " Cocoa With Tai Aai" च्या सेशन मध्ये पार पडायचे।

आता कामाच्या गडबडीत गेल्या काही  वर्षात सांगलीच्या ट्रिप थोड्या कमी झाल्या।  तरी आई कडून  ताईआई  बद्दल माहिती कळत राहायची। "पप्पूला एकदा येऊन जायला सांगा " असा निरोप आईकडून द्यायची।  पण प्रत्यक्ष गाठीभेटी झाल्या नाहीत तरी  वर्षातून एक दिवस मात्र नक्की  फ़ोन व्हायचा तो म्हणजे ३१ मार्च।  दर वर्षी न चुकता बरोबर  सकाळी ११: ३०  वाजता फ़ोन यायचा , " अरे पप्पू , बिजी नाहीस   ना रे  , कामात असतील तर नंतर करते फ़ोन, असे  म्हणतच "Happy Birthday हा , सुखी रहा " म्हणून फ़ोन ठेऊन पण दिलेला असायचा। " 

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात , आपण कर्तंव्य म्हणून किती तरी लोकांना "वाढदिवसाच्या शुभेच्छा " देऊन मोकळे होतो। तो बहुतेकदा जुलमाचा रामराम असतो।  निर्व्याज भावनेतून , आपल्यावरच्या प्रेमपोटी दिलेल्या वरील शुभेच्छा म्हणूनच अधिक सुखावतात।

आज पण ३१ मार्च आहे अणि आज पण  सकाळी ११: ३० वाजतील , पण तो एक फ़ोन मात्र आज नाही येणार ही भावनाच  मन व्याकुळ करणारी आहे।  ताई आई आज या जगात नाही याची जाणीव करुन देणारी आहे।  मला खात्री आहे आज पण तिची तिच गड़बड़ "स्वर्गात पण चालू असेल, तिच्या नेहमीच्या स्वरात तिथल्या अप्सरांना सांगत असेल " अहो अप्सरा बाई आज ना आमच्या पप्पुचा वाढदिवस आहे , फ़ोन करायचे लक्षात ठेवले पाहिजे "

तो कॉल  आपल्या पर्यन्त पोहचण्याची  " रेंज " अणि " बैंडविड्थ " आपल्या फोनमध्ये नाही ,तेव्हा तो मिस्ड कॉल च ताई आई ची आठवण सदैव माझ्या मनात ठेवेल।  ताई आई च्या स्मृतीस शतश: प्रणाम। 

Thursday 21 March 2019

Couple Goals & मी !

परवा ऑफिस कन्टीनमध्ये   बोलता बोलता ऑफिस मधील  सहकाऱ्याने  प्रश्न विचारला "What are your couple goals this year ?". फेब्रुवारी महिना नुकताच संपला होता अणि  महिन्याचे व्यावसायिक ध्येय(target)  पूर्ण झा ल्याच्या  आनंदात होतो। मार्चमध्ये पुढे काय वाढून ठेवले आहे अणि महिन्याचे उद्दिष्ट  कसे पूर्ण करायचे याची जुळ णी  मनात चालू होती. क्षणभर या प्रश्राने बावचळलो। "Couple Goals" हे काय  नवे पिल्लू  आहे असा विचार करत , " अजून असे  काही ठरलेले नाही " असे उत्तर देऊन सुटका करुन घेतली। मनात  मात्र विचार घोळत होता की  आता  नात्यांचे "Relationship" झालेल्या  काळ ा त  ती सुखी करण्यासाठी  "Goals"   (उद्दिष्टे )  ही निश्चित केली जाणार अणि  तुमचे नाते यशस्वी  की अपयशी हे आता या "Goals" च्या फुटपट्टीवर मोजले जाणार। सगळेच अद्धभुत अणि थोड़े अंगावर येणारे।

ऑफिस मधील काम आ ट पून  टॅक्सी मधुन घरी परत जात असताना  वाटेत २-३ मोठया  जाहिरात फलकांनी  (" Signage Boards") लक्ष वेधून घेतले। ती जाहिरात (ad) एका  फाइनेंस कंपनीची होती। " आपल्या प्रिय व्यक्तीला " लक्ज़री कार " भेट म्हणून देऊन  आपले "Couple Goals" साध्य (achieve)करा त्याला नवीन आयाम ( redefine) द्या व ते करण्यासाठी आम्ही "अर्था"तच तुमच्या सोबत आहोत।"

गम्मत म्हणजे टॅक्सी मध्ये रेडिओवर मस्त गाणे लागले होते  गाजलेल्या मराठी चित्रपटातले ("मुंबई पुणे मुंबई 2") गाण्याचे बोल होते

 " सा द  ही प्रीतीची ऐकुनी प्रतिसाद दे 
    रं ग हे नवे नवे बहरू दे  या जीवनी साथ दे।"

माझ्या मनातल्या  गोंधळाला समर्पक गोष्टी आजूबाजूला होत्या आपले नाते  खुलवताना  आयुष्य हे  " रंगभूमी" असावी का "रणभूमी" हा सवाल करणारी  परिस्थिती होती।

एक बाजूला उद्दिष्ट समोर ठेउन त्याची पूर्तता करून आयुष्याला आणि नात्याला अर्थ देण्याची धडपड होती तर दुसरीकडे  एकमेकांना समजून घेऊन नाते खुलवण्यासाठी केलेला प्रयत्न होता।

एकीकडे काहीतरी मिळविण्यातला आनंद होता तर दुसरीकडे एकमेकांच्या साथीने आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठीची धडपड होती।

काय बरोबर आणि काय चूक । मनातील अस्वस्थता  आणखीच वाढत होती। एकदाचा छडा  लाऊन टाकावा  म्हणुन  "Couple Goals"  म्हणजे काय  आणि  ती  कशी  ठरवायची  हे तपासले  तेव्हा लक्षात आले की  हे म्हणजे  "सुखी संसाराची गुपिते " किंवा " यशस्वी वैवाहिक जीवनासाठीचा मूलमंत्र " असल्या वर्गवारीत बसू शकेल अशी " नाते " यशस्वी करण्यासाठीची ( की टिकविण्यासाठीची ?) " सूची " आहे।  "विश्वास , परस्परांचा आदर , मनमोकळा संवाद , एकमेकांची काळजी"  या चतुष्पादांच्या खांद्यावर उभे राहुन नाते  मजबूत करताना " सत्व" राखत  वादविवादाचे  विसंवादात रूपांतर होऊ  न देण्याची " लवचिकता "दाखवत,  प्रसंगी "तडजोड" नामक  मलमपट्टी  करत एकमेकांचे मित्र होउन आनंदी राहणे  म्हणजेच " Couple Goals".

हे कळल्यानंतर  मन उगाचच भूतकाळात गेले।  माझ्या लहानपणी  आमच्या सांगलीमध्ये  एक प्रसिद्ध उद्योजक  लग्नामध्ये  "वधु-वरांना " आशीर्वाद  देताना " त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट आणि " सुखी संसाराची सुत्रे " या विषयावरचे  त्यांनी लिहलेले एक छोटे  पुस्तक " भेट म्हणून द्यायचे  अणि  वधुला आशीर्वाद देताना  " अखंड सौभाग्यवती हो" या अत्यंत अशक्यप्राय  वचनाऐवजी "सदा आनंदवर्धिनी  रहा " असा व्यावहारिक आशीर्वाद द्यायचे। या  "आनंदवर्धिनी" या शब्दामध्ये मोठी मौज आहे। "Multiplier Effect" हे जे काय असते ना  तसे "जीवनाचा रसरशित आनंद घेत  अणि तो सर्वांना देत सर्व परिवाराचे आयुष्य  तु आनंदी ,सुखी कर" असा आशीर्वाद  देणारे अणि घेणारे आता थोड़े कमी झाले आहेत हे नक्की। 

वैज्ञानिक प्रगति  अणि  भौतिक सुखे  याने मानवी जीवन खरेच खुप सुखी बनविले। प्रगतीच्या संधि अणि  तंत्रज्ञानाची भरारी यामुळे जगण्याची प्रक्रिया अधिक आरामदायी झाली।  पण प्रत्येक सुन्दर गोष्टीला  कुठे तरी एक कारुण्याची छटा असते असे म्हणतात  तशी या वर वर दॄष्ट लागावी  अश्या दिसणाऱ्या सुंदर आयुष्याला एक कारुण्याची किनार आहे. " एकमेका सहाय्य करुँ। अवघे धरु सुपंथ। " असे  म्हणत  चालणारे "participative" समाजजीवन  कुठेतरी मागे पडून  " जीवो जीवस्य जीवनम :" ( one living is food for another) हा  जंगलाचा कायदा आता कॉन्क्रीट च्या जंगलात देखील चांगलाच रुळला आहे.  भौतिक प्रगती अणि सुखी जीवन याची अशी काही जबरदस्त सांगड घालण्यात  आली  आहे  की " शहरे " ही " लोकांनी एकत्र येऊन सहजीवन उपभोगण्याची जागा न राहता  " द्रव्योपासकांचा  अड्डा " बनली आहेत। " संवाद हरवत चाललेला असताना  वास्तविकता (Reality) अणि  स्वप्ने ( dreams) यांच्यातील दरी बुजविताना होणारी दमछाक विसंवाद वाढवत आहे। गगनचुम्बी उंच इमारतीत  आपल्या ऑफिस मजल्यावर "लिफ्ट "मधून जाताना केल्या जाणाऱ्या "Hello, How are you ?" मधल्या औपचारिकतेमुळे त्याला " कसे काय बरे आहात ना ?" मधील आपुलकीचा स्पर्श होताना दिसत नाही. रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष  माणसाला "रणभूमी " वरील लढवय्या  बनवत असून "रंगभूमीवरील " आविष्कार निर्मितीसाठी त्याच्याकडे अंमळ वेळच नाही  आहे।

पाश्चिमात्य संस्कृतिचे अनुकरण करताना विज्ञाननिष्ठा , व्यावसायिकता  या सारख्या  चांगल्या गोष्टी  आपल्या आचरणात आल्या , पण "ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला। वाण  नाही पण  गुण  लागला  ." या न्यायाने  चंगळवाद , भोगवाद  या सारख्या  आगन्तुकानी देखील आपले बस्तान बसविले।  "मद्य अणि मदिराक्षी "यांची जणू सुसंगत जडून "रस"बोधाची पारायणे  हाच सुखासाठीचा उतारा  आहे  ही समजूत दॄढ होऊ लागली। "व्यक्तिस्वात्रंत ", "आधुनिकता " म्हणजे  " कुत्र्यामांजरासारखे  चारचौघात  शरीराचे भोग उपभोग घेणें" हे   "Public Display of Affection" (PDA). च्या गोंडस नावाखाली सर्वमान्य झाले। आयुष्यात " रोज काहीतरी नवीन केले तरच थ्रील आहे " या अचाट हट्टापायी " रोज नवीन गाड़ी किंवा बाहुली  पाहिजे " म्हणणाऱ्या  लहान मुलांनी " उद्या मोठे झाल्यावर  रोज नविन बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड " मागितली तर चूक कुणाची। अश्या गोंधळात नाती ती टिकतील तरी कशी !

अश्या या गोंधळाच्या वातावरणात "दुनिया झुकती है ,झुकानेवाला चाहिये। " च्या धर्तीवर " यहाँ सब कुछ बिकता हैं , बेचनेवाला चाहिये " हे तत्त्व कोळून प्यालेल्या "Ad guru"नी  परत आम्हाला आमचीच  मूल्ये शिकविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढल्या। " Mother's Day", " Father's Day", आपण मोठ्या उत्साहाने साजरा करू लागलो अणि भौतिक सुब्बतेसाठी जीवाचें रान  करताना नात्यांवर येणारा ताण हलका करण्यासाठी मग " Couple Goals" आले। सहजीवनातून नाते फूलविण्याऐवजी लक्ष्याधारित आनंद मिळविल्याकडे वाटचाल चालू झाली। मग त्या लक्ष्याधारित आनंद निर्मितीच्या यादीत  कधी " लक्ज़री कार " आहे  तर कधी " फॉरेन ट्रिप " आहे।

नुकताच  जागतिक महिला दिन साजरा झाला।  त्या दिवसाच्या उत्सवाची थीम होती "Balance for Better. "
खरच हाच "balance" जर आपण आपल्या जगण्यात आणला  तर आयुष्य अणि नाती "better" झाल्याशिवाय राहणार नाहीत।

विले पार्ले आले अणि  टैक्सीवाल्याला पैसे देऊन घरी पोचलो  , माझ्या " २०१९ च्या couple Goal" सहित।  ते अर्थातच आहे " Balance for Better."



  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...