Saturday, 18 January 2020


हिन्दू पद पादशाही  : पानिपत & Beyond

Image result for maratha warriorनवीन दशक चालू होण्याच्या उंबरठयावर  जे अनेक बदल आपण पाहतो आहोत त्यातील सर्वात मोठा बदल   म्हणजे  गेल्या दशकातील तंत्रज्ञानाने  उत्तम सेवा( Excellent Customer  Service ) देणारी संसाधने( Resources )  हाती दिल्यानंतर माणसाचा प्रवास हा ते वापरून आपले जीवन समृद्ध करण्याकडे चाललेला दिसतो।  त्यातील परवालीचा शब्द म्हणजे जीवनाभुव ( Life Experiences  ). मग तो घेतलेला नवीन मोबाइल असो किंवा केलेली एखादी ट्रिप असो।  तो अनुभव ही जगण्याच्या प्रवासातील शिदोरी बनते ।  कधी ती माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करते, आनंदित करते  तर कधी  कटू आठवणी देते, मनात खंत निर्माण करते ।  ही जी मनाला खात राहणारी खंत आहे ना ती जशी वैयक्तिक असते तशीच ती एखाद्या समाजाची किंवा समुहाची पण असते।  " छत्रपती  शिवाजी महाराज" यांच्या सारख्या  विभूतीचे नाव जरी उच्चारले तरी गर्वाने खुलणारा आपला मर्द मराठी माणूस  अशीच एक खंत गेली  जवळजवळ अडीच (२. ५ ) शतके (२५९ वर्षे ) आपल्या उराशी बाळगून आहे ती म्हणजे "१४ जानेवारी १७६१ साली झालेले  पानिपतचे युद्ध अणि  त्यातील आपला (मराठ्यांचा )पराभव।"

तो पराभव  म्हणजे 

  •  छत्रपतींच्या प्रेरणेने आणि  त्यांनी लावलेल्या "स्वराज्याच्या " रोपट्याचे वटवृक्षात(साम्राज्यात ) रूपांतर करून , अटकेपार झेंडे फड़काविणाऱ्या ( पंजाब / लाहोर ताब्यात घेऊन दुर्रानी फौजेला काबुलकड़े  पळण्यासाठी भाग पाडणाऱ्या) व संपूर्ण मुघल भारतात ( राजपुताना , माळवा  , गुजरात , आग्रा , अजमेर )चौथाईचे / महसूल गोळा करण्याचे हक्क प्रस्थापित केलेल्या मराठ्यांचे  "ईराणच्या पातशाहीची "मदत घेऊन काबुल अणि कंदहार ताब्यात घेण्याचे (दुर्रानी घराणे संपविण्याचे  ) मनसुबे धुळीला मिळविणारा 
  • आर्थिक आघाडीवर थकविणारा ( काही कोटी रुपयांचे कर्ज
  • मराठा साम्राज्याची  (थोड्याकाळासाठी) घडी विस्कटणारा 
  • आजच्या भाषेत बोलायचे झाले तर "Demographic Dividend " ( तरुण लढवय्ये, साहसी सरदार , भावी पेशवा  अणि ७००००+ अधिक लोक या लढाईत मारले गेले  ) उद्ध्वस्त करणारा हा पराजय होता।
  •  "जिहाद " ही संज्ञा वापरून  झालेली पहिली हिन्दू-मुस्लिम लढाई ज्या मध्ये हिन्दू सरदार (मराठे) दिल्लीच्या तख्तासाठी (मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी की मातृभूमीच्या रक्षणासाठी) परकीय मुसलमान आक्रमकांसोबत  (अफगान दुर्रानी , रोहिल्ला ) लढले होते।
अशी भौगोलिक ,आर्थिक ,राजकीय अणि धार्मिक कंगोरे असलेली इतिहासातील ती बहुदा पहिलीच मोठी लढाई

अशी दुःखे  किंवा मनाला लागलेली टोचणी  / खंत आपल्याबरोबर एक भाबडी आशा घेऊन येते। जी आशा शक्याशक्यतेच्या हिंडोळ्यावर आपल्याला झुलायला लावते। अमुक केले असते तर कदाचित तमुक झाले असते असे गणिती समीकरण मांडून इतिहास कदाचित वेगळा असता अशी वेडी उम्मीद जागवते । याच समीकरण मांडणीत मग घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला जातो। लढाईची परिस्थिति, त्यातील मोहरे , डावपेच , नेतृत्व यांचे  सविस्तर विश्लेषण  करून  वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात। ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटते कारण त्याने जरी इतिहास बदलणार नसला तरी झालेल्या चूका , चुकलेले डावपेच   याचे नेमके आकलन होते अणि भविष्यात तशा  चूका  पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेता येते। कारण  विस्टन चर्चिलने म्हटल्याप्रमाणे " Longer you look back, farther you can look forward."

तसे पाहिले तर ही  ऐतिहासिक घटना  आणि आजचे आपले  जीवन ,उद्योग  यात काय  संबंध।  त्यातील घटना आजच्या व्यवस्थापकीय रचनेसाठी ( Modern Management) खूप काही धड़े , शिकवण समोर ठेवते।   कारण शेवटी काळ बदलला तरी " जिंकणे अणि त्यासाठी शत्रूचा पराभव करणे " हेच समान सूत्र आहे।  आजच्या व्यवस्थापकीय रचनेचा पायाच यावर रचला केला आहे।  त्यामुळेच  या रचनेत  " Battle Field ", "Logistics ", " Leading  by  Example", " Personality  Cult / Character " , " Territorial gains( Market  Share)  या सारखे शब्द  येतातच ।

व्यवसाय नियोजन अणि विस्तारीकरण( Business Management & Expansion ) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अणि कोणत्या गोष्टींचे अनुकरण केले पाहिजे याचा ऊहापोह करते।त्याकडे वळण्यापूर्वी  प्रथम या लढाईची पार्श्वभूमी  विचारात घेणे तितकेच गरजेचे आहे ( घाबरू नका " पानिपत घडण्याची ५ कारणे सांगा " या सारख्या शालेय इतिहासाच्या पेपरातील  प्रश्न मी नक्कीच तुमच्या समोर मांडणार नाही।  चिंता नसावी )

त्याची पार्श्वभूमी दडली आहे ती " राघोबा दादा( रघुनाथराव )  यांची मल्हारराव होळकर अणि दत्ताजी शिंदे यांच्या साथीने उत्तरेतील  साम्राज्य विस्ताराची मोहिम ( Northern expedition  १७५७ -१७५८ )ज्यामध्ये  मुघल बादशहाचे रक्षक म्हणून प्रथम केलेला नजीब खान रोहिल्याचा पराभव ( मीर बक्षी* होण्याची त्याचे मनसूबे धुळीला मिळविणारा  ) अणि अफगाण आक्रमणापासून केलेले दिल्लीचे संरक्षण।  त्यापुढे या शूर वीरांनी मारलेली पंजाब अणि लाहोर प्रांतातील मुसण्डी( अटकेपार झेंडा याच मोहिमेची फलश्रुती )।  एकीकडे नजीब खानाला त्याची जागा दाखवून देतानाच दुसरीकडे अहमद शाह अब्दालीच्या मुलाचा  (तैमूर खानचा  ) केलेला पराभव व दुर्रानी फौजांनी काढलेला पळ। याचे नैसर्गिक  परिणाम म्हणजे बदला घेण्यासाठी टिपलेले दुर्रानी अणि रोहिले। या दिग्विजयाततील  काही अडचणी  , आखलेले मुस्सदी डावपेच उलगडणे तितकेच गरजेचे  । या मोहिमेसाठी लागणारी आर्थिक कुमक जमविताना  राघोबा दादांना आलेल्या अडचणी , राजपुताना प्रदेशात लूट करून करावी लागलेली सैन्याची व्यवस्था, ती  सोय लावण्यासाठी वेळोवेळी जाट लोकांशी अणि राजपूत लोकांशी झालेल्या झटपटी  जेणेकरून लढणारे सैनिक उपाशी राहणार नाहीत  . ही सोय लावत असतानाच ज्याला आपण मुस्सदी डावपेच म्हणतो तो म्हणजे अवधचा नवाब "सिजा उद दौला " याने घेतलेला तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय ज्यामुळे नजीब  खान रोहिल्याची गंगा यमुना दोआब भागात मराठे लोकांना करता आलेली कोंडी। या दिग्विजयानंतर मुग़ल भारतात उठलेली आवई ती म्हणजे " विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बसविणार बादशाह म्हणून ।
*(मीर बक्षी: Paymaster  General / Commander in Chief)

यातूनच  पानिपतच्या लढाईची बीजे रोवली गेली  ती अशी
  • रोहिले अणि दुर्रानी यांच्यातील  मराठ्यांबद्दलची बदल्याची भावना 
  • हिन्दू पद पादशाही (" विश्वासराव "ला नानासाहेब पेशवा दिल्लीच्या गादीवर बादशाह म्हणून नेमणार) या  पहिल्या बाजीरावाच्या स्वप्नाची पूर्ति होणार या भीतीने मुस्लिम मुस्सदी अणि धर्मगुरु यांनी दिलेली इस्लाम खतरेमें ची  हाक अणि दुर्रानी राजाला (अहमद शाह अब्दालीला ) धर्म वाचविण्यासाठी केलेली विनंती 
  •  मराठे दिल्लीच्या गादीवर बसले  तर आपल्याला जास्त  चौथाई/महसूल द्यावा लागेल या भीतीपोटी विरोधात गेलेले जाट, गुर्जर  & तटस्थ  राहिलेले राजपूत 
  • इस्लाम खतरेमें च्या नावाखाली "जिहाद " पुकारून अवधचा नवाब "सिजा उद दौला " या शिया मुस्लिम प्रशासकाला  आपल्या बाजूने वळविणारी नजीब खान रोहिला  या सुन्नी मुस्लिम सेनानीची मुस्सदेगिरी
आता लढाईची पार्श्वभूमी समजल्यानंतर आजच्या व्यवस्थापकीय रचनेच्या ( Modern Management) दृष्टीकोनातून त्याचे विश्लेषण  करणे थोड़े सोपे जाईल

१७५७ -१७५८  च्या पराभवाचा  वचपा  काढण्यासाठी ज्यावेळी  अहमद शाह अब्दाली अणि नजीब खान यांच्या फौजेनी दिल्ली गाठली अणि बादशाहला ताब्यात घेतले तेव्हा त्यांचे संरक्षक म्हणून मराठे जेव्हा दिल्लीकडे जायला निघाले  तेव्हा

 नेतृत्व (Leadership ) :

वर उल्लेखलेल्या यशस्वी मोहिमेनंतर  राघोबा दादा अणि होळकर , शिंदे, बुंदेले हे सरदार या मोहिमेचे नेतृत्व करणार यात  काहीच शंका नव्हती। मागच्या मोहिमेतील अनुभवावरुन  या मोहिमेवर जाण्यासाठी राघोबा दादां नी  कोटी रुपयांची मागणी केली। सैन्य जगविण्यासाठी  रसद , धान्य पुरेसे असावे अणि राजपूत, जाट, गुर्जर यांच्या कडून फारशी मदत होणार नाही हे ओळखून  ही मोठ्या रकमेची मागणी होती  त्यावेळेच्या आर्थिक परिस्थितीत नानासाहेब पेशवा ती मागणी मान्य करणे अवघड होते।  नुकत्याच निजामविरुद्ध झालेल्या लढाईत विजय मिळविलेला सदाशिवराव भाऊ अर्थातच जोशात होता त्याने या मोहिमेचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शविली।  भाऊ अणि विश्वासराव कितीही पराक्रमी असले तरी उत्तरेतील त्यांची ही पहिली मोहिम होती . राघोबा दादा सारखा अनुभव अणि येणाऱ्या संकटांचा अंदाज त्यांना नव्हता।  होळकर , शिंदे , बुंदेले मदतीला होतेच पण  कुठेतरी अनुभवी अणि पराक्रम सिद्ध केलेल्या सरदाराला डावलून तरुण धाडसी पण अननुभवी नेतृत्वाच्या बरोबर  लढणे त्यांच्या पचनी पड़णे थोड़े अवघड होते।  त्यांच्या निष्ठेविषयी शंका कधीच नव्हती  पण त्यातून जाणाऱ्या इशाऱ्याची भीती  होती।

Modern Management Lessons:

  • Put Your Best foot forward
  • Opportunity must be given to Young/Energetic Turks, but the same needs to be calibrated by Experienced Commander in chief ( Leader) who understands the intricacies of battlefield to avoid disruption

संसाधने (सैन्य , लवाजमा , युद्धसज्यता , रसद ): Resources


मराठ्यांच्या शौर्याचा डंका पूर्ण भारतवर्षात गुंजत असताना  सदाशिव राव भाऊ  , विश्वासराव २०००० चे सैन्य अणि इब्राहिम गर्दीचे ९००० सैनिक अशी फौज घेऊन दिल्लीकडे निघाले। होळकर , शिंदे , बुंदेले हे  सरदार अणि त्यांची मंडळी पण  बरोबर होतीच।  तोफखाना , बन्दुका , घोड़े  हत्ती , तोफा  असा मोठ्ठा लवाजमा बरोबर होता।  त्यावेळी मराठे अशा विजयी मानसिकतेत होते की ही लढाई एक औपचारिकता  होती  या अफगाणी लोकांचा पुन्हा पराभव करण्याची।  साहजिकच उत्तरेतील मोहिम  असल्यामुळे अणि त्या भागात हिन्दू तीर्थस्थाने येत असल्याने तीर्थयात्रा करण्यासाठी सुमारे २००००० लोक( सरदारांच्या बायका , त्यांचे सेवक , तीर्थयात्री ) या सैन्याबरोबर दिल्लीकडे निघाले होते। मराठी सैन्याने मार्च १७६० मध्ये दिल्लीकडे कूच केली।  तापी , नर्मदा , चंबळ , यमुना ओलांडून दिल्ली गाठायाची होती।  साधारण पावसाळा ( जुलेे ) सुरु होण्यापूर्वी या नदया ओलांडणे  गरजेचे होते।  हा प्रचंड लवाजमा , तोफखाना या सर्वांसकट चंबळ  ओलांडून आग्र्याच्या वेशीपर्यंत पोचण्यासाठी मराठी लवाजम्याला  जून १७६० उजाडला।  गंभीर नावाची छोटी नदी पार करून  आधी आग्रा अणि यमुना पार करून मग दिल्लीकडे जाण्यासाठी  थोडेच दिवस शिल्लक राहिले। पहिला बाजीराव जे अंतर ४ दिवसात कापायचा ते अंतर पार करण्यासाठी या लवाजम्याला २० दिवस लागत होते। अथक प्रयत्न करून गंभीर नदी ओलांडल्यानंतर आग्रा पोहचेपर्यंत " जिहादच्या हाकेने "अवधचा नवाब 'सिजा उद  दौला'  नजीब खान रोहिला अणि अब्दाली यांना मिळाला होता।  पावसाळा चालू झाल्याने नदी पार करणे कठीण जात होते , अनेक घोड़े  "तमाशा" या रोगाने मरण पावले।  पावसाळ्यामुळे  तोफखाना घेऊन नदी ओलांडणे अवघड जात होते ।  अन्नधान्य संपत चालले होते रसद पुरविण्यासाठी उपयुक्त असलेला अवध प्रान्त त्याच्या नवाबमुळे विरोधात बसला होता। अशा बिकट परिस्थितीत खूप प्रयत्नान्तर मराठे सैन्य दिल्लीत (यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर )पोहचले। दिल्लीत अफगानी लोकांचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली।  तिथे पैसे (सिंहासन वितवळून चांदीची नाणी पाडली ) अणि रसद, धान्य यांचा बंदोबस्त केला। अब्दाली अणि नजीब खान यमुनेच्या पूर्वेला होते।
पूर्वीच्या युद्धपद्धतीनुसार नदी ओलांडायचे जे उतार असतात ते अडवून शत्रुला जेरीला आणायचे  असते।  ते काम अर्थातच  दत्ताजी शिंदेंकड़े होते। याच  सुमारास सूरजमल जाट लढाईतून  माघार घेऊन तठस्थ राहिला ( कारण आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार )।

Modern Management Lessons:


  • This is like Cricket. Centurion in one game needs to go out in the second game and start making runs from zero.  Or like Mutual Fund advisory : Past Performance does not guarantee future returns"
  • Lean & Mean resource Management to achieve timely delivery & battlefield readiness( Time to market)
  • No Mixing of Business & Pleasure
  • Clear & Effective Communication to forge critical alliances
  • Resource Management
युद्धाची ठिणगी व मराठ्यांची कोंडी ( Building up to Battle)

दिल्ली हातची गेल्यामुळे अब्दाली अणि नजीब खान संधीची वाट पाहत होते।  एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी थोड्या  चकमकी होत होत्या।  यमुना पर करण्याचे प्रयत्न होत होते।  अश्याच एका चकमकीत बुरारी घाट येथे दत्ताजी शिंदेंना अफगाणी  फौजांनी मारले। ही बातमी कळल्यानंतर मराठे सैनिकांनी बदला घेण्यासाठी कुंजपुरा किल्ल्यावर जेथे अफगाणी  फौजेची रसद होती , धान्य होते अणि अब्दालीचे शूर सरदार होते तिथे  हल्ला करून अफगाणी लोकांचा पराभव केला।  १०००० अफगाणीसैन्याची कत्तल केली।  धान्य , रसद गोळा  केली।  विजयानंतर कुरुक्षेत्र जवळ असल्याने तीर्थयात्रेसाठी मराठी लवाजमा तिकडे गेला। अब्दालीला ही गोष्ट कळल्यानंतर  याचा बदला घेण्यासाठी पावसाळ्यांत दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडण्याचा बेत त्याने आखला।  गुलाबचंद गुर्जर (आता मराठे जिंकणार अणि विश्वासराव बादशाह होणार , म्हणून अब्दालीला सामिल झालेला ) याने त्या वेळी यमुना पार करण्यासाठीचा बागपत जवळील उतार अब्दालीला दाखविला  अणि अब्दाली सैन्यासह दिल्ली अणि कुरुक्षेत्र याच्या मध्ये येऊन थांबला।  या पुढील काळात जवळ जवळ दोन महीने  चकमकी होत राहिल्या , दोन्ही बाजूचे काही सैनिक मारले जात होते। अब्दालीच्या सैन्याच्या ठिकाणामुळे मराठे सैन्याला रसद, मदत मिळणे  अवघड झाले।  ऑक्टोबर ते डिसेम्बर या दोन महिन्यात धान्य , रसद संपत चालली होती।  चारा  नसल्यामुळे जनावरे मरणे  चालू झाले होते।  दिल्ली कडून मदत घेऊन येताना  बुंदेले , मानकेश्वर सरदार पकडले गेले अणि अब्दाली अणि त्यांच्या सैनिकांनी त्यांना मारून  पैसे लुटले।  भाऊ अणि त्यांचे निरोप  पुण्यापर्यंत पोचण्यासाठी वेळ लागत होता। त्याच वेळेला पश्तून सैनिकांच्या टोळीने पंजाब प्रांता कडून मराठ्यांना घेरून रसद मिळविण्याचा मार्ग बंद केला।  राजपूत , गुर्जर  तठस्थ होते त्यामुळे मदत मिळाली नाही। मराठे सैन्याचे मनोबल खच्ची होत  चालले होते लढाईत मरण्यापेक्षा उपसमारीने मरण्याची वेळ सैन्यावर आली होती। अशा परिस्थितीत आक्रमण करण्याची तयारी भाऊ , गार्दी , मराठे सरदार यांनी चालू केली। अब्दालीकडे असणाऱ्या दुर्बिनीने तो हे सर्व पाहत होता।  उंटावरुन चालविल्या जाणाऱ्या तोफा त्यांच्या कड़े होत्या।  हे कमी म्हणून की काय  हवेची दिशा पण मराठे लोकांना साथ देत नव्हती , त्यामुळे मेलेल्या लोकांच्या , जनावरांच्या प्रेताच्या दुर्गंधीने मराठे हैराण झाले होते।


Modern Management Lessons:
  • Clear & Effective Communication about the intent, goal, possible outcome with allies, partners.
  • Channel preparation for seamless flow of information, resources in case of crisis
  • Expect the unexpected due to uncontrollable factors like weather,, Rules, Regulation change etc.
  • Use of latest Technology
प्रत्यक्ष युद्ध (Battle )

उपासमार  यामुळे होणारे सैनिकांचे हाल , लोकांचे खचत चाललेले मनोधैर्य  यामुळे भाऊ अणि विश्वासराव यांनी आता लढाईचा पवित्रा घेतला।  त्याप्रमाणे व्यूहरचना तयार केली।  इब्राहिम गार्दी ह्याने फ्रेंच लोकांकडून शिकलेले "Qol" किंवा " Ghol" हे युद्ध तंत्र  वापराचे ठरविले ज्यामध्ये तोफखाना , त्यामागे दोन सैनिक तुकडीमध्ये  ,मध्ये बरोबरचे लोक (जे सैनिक नाहीत ),  त्यानंतर भाउ विश्वासराव यांची हुजरात व शेवटी लढणारी तुकडी असे स्वरुप होते।  एका बाजूला गार्दीच्या तोफा होत्या , दुसरीकडे जनकोजी शिंदे , होळकर यांच्या तुकड्या होत्या।  गार्दीच्या तोफांनी रोहिल्ल्यांची
दाणादाण उडवली होती  काही हजार रोहिले मरण पावले।  मराठे अब्दालीला भारी पडत होते।  इथे दोन गोष्टी घडल्या।  या मराठ्यांच्या आक्रमणाने उत्साहित होऊन जनकोजी शिंदे अणि काही सरदार मंडळी "Ghol " तोडून लढायला पुढे सरसावली त्यामुळे गार्दी लोकांना तोफा थांबवायला लागल्या।  त्यातच अब्दालीने उंटांवरून तोफा डागल्या।  अणि एक गोळी विश्वासरावला लागली। अपशकुन झाला।  खचलेले सैन्य सैरभैर पळ लागले। भाऊ लोकांना लढायचे आव्हान करतो आहे  पण लोक पळून गेले।  तेव्हा अब्दालीने आपली १००००+ लोकांची reserve फौज बाहेर काढली अणि त्या फौजेने  दमलेल्या मराठे सैनिकांचा पराभव केला।  दुसऱ्या दिवशी कुंजपुराच्या सैनिक कत्तलीचा  बदला म्हणून ४००००+ लोकांची कत्तल केली।

Modern Management Lessons:
  • Strategy  needs to be explained to people on the ground to make that effective
  • clear communication w.r.t strategy will make it more reliable for execution.
पराभव नंतर ....

साधारणपणे जेता अणि पराजित यामध्ये जे नाते असते तसे या लढाई नंतर झालेले दिसले नाही. एक तर या युद्धाआधी  बरेच दिवस भारतात तळ  ठोकून बसलेल्या अब्दालीला अफ़ग़ाणिस्तानात बं डाळीची भीति निर्माण झाली त्यामुळे पराभव नंतर देखील मुघल इंडिया चे संरक्षक म्हणून मराठेंना कायम करण्यात आले।  अब्दालीचे पण  ५००००+ अधिक लोक मारले गेले होते।  खऱ्या अर्थाने ही लढाई "Pyrric victory" होती ज्यामध्ये दोन्ही बाजूचे खुप नुकसान झाले।

Modern Management Lessons:
  • Price war, Win at any cost sometimes create huge drain on resources which result in log term reverses for the organisation even in the short term victory/ territorial gains

साहजिकच  पुढे थोरल्या माधवरावच्या नेतृत्वाखाली मराठे लोकांनी नजीब खानाला धड़ा शिकवला।  दिल्ली चे संरक्षक म्हणुन आपली जागा अधिक पक्की केली अणि २० + वर्षे दिल्लीत आपला भगवा ध्वज मानाने पडकत ठेवला।

  " त्यावळेची हिन्दू पद पादशाही " अणि आताचे " हिन्दू राष्ट्र " या संकल्पनांमध्ये कमालीचे साम्य आहे।   त्यावेळेच्या चूका पुन्हा करायच्या नसतील तर संवाद (Communication) हे अत्यंत महत्त्वाचे आहे।  पेशवा दिल्लीच्या गादीवर बसणार म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरविणारे जाट अणि राजपूत हिन्दूच होते। " Citizen Amendment Act(CAA): च्या मुद्द्यांवर "गुद्दापेक्षा चर्चा " महत्त्वाची ठरणार आहे।  CAA ला विरोध करणारे पण हिंदूच आहेत। तो निर्णय  हा का गरजेचा आहे हे पटवून सांगणे गरजेचे ठरेल। " इस्लाम खतरेमें " ची आवई  तेव्हा पण होती आज पण माध्यमे तीच धून गात आहेत। पूर्वी आक्रमणे  खैबर खिंडीतून होत  होती आज "खैबर पख्तूनका (KPK), बालाकोटमध्येच भारताचे शत्रू दडलेले होते ।  राष्ट्रभक्त मुस्लिम लोकांना काळजीचे कारण नाही हे ठसवणे तितकेच गरजेचे कारण त्यावेळी पण गार्दी लोक   पेशवांंसोबत होतेच।

संक्रांत साजरी करताना  पानिपतचे स्मरण गरजेचे आहे  कारण त्यातून मिळणारी शिकवण पुढे संक्रांत ओढ़विणार नाही यासाठी उपयुक्त ठरु शकेल।

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।


Monday, 6 January 2020

                                                    Diversity & Scotland of India 

Image result for coorg pictures selfie pointImage result for coorg pictures selfie pointImage result for coorg pictures coffee plantation

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना  घडून गेलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणे अणि   नविन वर्षाकडून  असणाऱ्या अपेक्षांचे सुतोवाच  करणे  तसे आता नित्याचेच । कधी  ते वेगवेगळ्या माध्यमांच्या "Annual Conclave" मध्ये  चर्चिले जाते तर कधी ते घरबसल्या होणाऱ्या गप्पांच्या अड्ड्यात रंगते ।  

सरत्या वर्षाची हळहळ अणि नविन  वर्षाची हुरहुर  या भावनाकल्लोळामध्ये  आर्थिक , सामाजिक ,  कौटुंबिक , राजकीय अशी  जीवनाची सर्वच अंगे  व्यापून जातात।  कुठे  ती "मंदिर वही बनायेंगे"ची अपेक्षापूर्ति असते तर कुठे  " मित्रपक्षाने दगा दिला ... नाहीतर सरकार आमचेच होते " चा उसासा असतो।  कुठे  ती  " 5 Trillion  dollar economy  in 2022 : जुमला की वास्तव " ची  गहन आर्थिक चर्चा असते  तर कुठे  "रोजगार विरहित आर्थिक वाढ( Jobless Growth); Industry 4.0 अणि त्याचे सामाजिक परिणाम (Social Impact)" वरचे सुंदर विवेचन असते।  कधी ती "दुसऱ्या घरखरेदीची" स्वप्नपूर्ति असते तर कुठे "हुकलेल्या  नोकरी /व्यवसाय /परदेशातील संधीची " हुरहुर असते।  या सर्व गोंधळात(कोलाहल हा  शब्द खरे तर फिट बसेल ) खालील २-३ गोष्टींनी ठळकपणे  माझे लक्ष वेधून घेतले त्या खालील प्रमाणे :

  • हिंदुस्तान टाइम्सच्या "Annual Conclave "  मधील 3K (करीना कपूर खान ) & AK ( अक्षय कुमार ) यांची मुलाखत आणि  करीनाने व्यक्त केलेली "Equal Pay for Lead Actor & Actress" ची  इच्छा  
  • हिंदुस्तान टाइम्सच्याच  "Annual Conclave "  मधील  ट्विंकल खन्ना (Mrs Funny bones & Pajamas are forgiving ची लेखिका )& अमिश त्रिपाठी (Shiva Trilogy & Sita  etc. पुस्तकांचे लेखक ) यांची मुलाखत  आणि  ट्विंकलने  व्यक्त केलेली अपेक्षा ; ती म्हणजे " No. 1 Female Author in India"  पासून " No.1 Author in India "  बनण्याचे स्वप्न। 
  • "Tata Sons-Dalberg " यांनी केलेला भारतातील सर्वे अणि त्याचे निष्कर्ष (Findings) " 12 कोटी  उच्च माध्यमिक शिक्षण झालेल्या मुली  सामाजिक रुढि , सुरक्षा , कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे  नोकरी /उद्योग  करत नाहीत।  अणि जर त्यांनी काम करायचे ठरविले तर  भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात(GDP)  $440 billion( ३१  लाख करोड़ रूपये )  भर आपण घालु शकू।या संधीचा अवाका लक्षात घ्यायचा असेल तर हा नंबर  सध्याच्या भारताच्या GDP च्या १५ % आहे।  
यातील पहिले  दोन संदर्भ  हे आपण आजूबाजूला पाहत असलेल्या "India"ची प्रतिनिधिक उदाहरणे आहेत।  स्री शिक्षण , स्रियांचा सेवाक्षेत्रातील वाढता वावर , त्यांच्या आशाआकांक्षा , स्वतंत्र विचारशैली  अणि  उराशी  जपलेली स्वप्ने , ती सत्यात उतरवण्याची जिद्द  हे एका बाजूला अणि  ही प्रगति उत्तरोत्तर होत रहावी म्हणुन पोषक वातावरण निर्मिति ही दुसऱ्या बाजूला अशा सशक्त चाकांवर "Diversity Express" वेगाने पळत आहे। तर तिसरा संदर्भ  हा  "Bharat " या संकल्पनेमधील "Potential " & ते फुलू देण्यासाठी  जर आपण मार्ग शोधले  तर निर्माण होणाऱ्या अमर्याद प्रगतीच्या संधी "बेटी बचाओ / बेटी पढ़ाओ " या सरकारी घोषणेला खऱ्या अर्थाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा निर्माण करणारा ।

हा विचार मनात रेंगाळत असतानाच  वर्षअखेरीस कौटुंबिक सहलीसाठी मी "Scotland of  India " ला भेट दिली। ( देशी सहल करणे हा foul धरला जात असल्यामुळे केलेल्या देशी सहलीला परदेशी सहलीचे आवरण चढवुन जग रहाटी पाळण्याचा केलेला भाबडा प्रयत्न।  असो ).

आमच्या सांगली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने निम्मा असलेला , ७५% भूभाग जंगलानी व्यापलेला , जैवविविधेत अत्यंत श्रीमंत असलेला , पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे वसलेला, "ब्रह्मगिरी " अणि "सुब्रमण्यम "या पर्वत रांगांच्या अंगाखांद्यावर खेळणारा , कावेरी(नदी ) अम्माच्या  मांडीवर खुलणारा,  निसर्गाने मुक्त हस्ताने वरदान बहाल केलेला प्रदेश म्हणजे "कोडागु (Kodagu )". १९५६ पर्यन्त स्वत्रंत राज्य असणारा अणि नंतर त्यावेळच्या म्हैसूर (Mysore ) राज्यात विलीन झालेला व आता कर्नाटक राज्याचा भाग असलेला  हा नितांत शांत अणि सुंदर प्रदेश म्हणजे "कूर्ग (Coorg )".

जसे कोकण म्हटले की  " हा सागरी किनारा। ओला सुगंध वारा " या ओळींप्रमाणे  अथांग सागर अणि त्याच्या साथीने फुलणाऱ्या नारळी फोफळीच्या बागा , फणस ,सुपारी , काजू अणि आंबा (Mangoes ), कोकम हा रान मेवा  अशा सगळ्या गोष्टी मनात येतात। त्यात भर म्हणून  जोडीला  जर भात अणि माश्याचे कालवण असेल तर आनंदाची परमावधीच।  त्याचप्रमाणे "कूर्ग (Coorg ) म्हटले की  दोन्ही हात पसरून  आपल्याला  आलिंगन देणाऱ्या हिरव्यागार पर्वतरांगा ,  मातेच्या मायने आपल्याला  अंगाखांद्यावर खेळविणारी कावेरी(नदी ) अम्मा  अणि " Number 54 & the house with a bamboo door"या गाण्याप्रमाणे  पिवळ्याशार मातीतील बाम्बुचे , ओक वृक्षाचे वन अणि त्या सावलीत फुललेला रत्नांचा महल म्हणजे " कॉफी( Coffee )"& " मसाल्याच्या ( Spices ) " बागा म्हणजे मुक्त हस्ताने निसर्गाने केलेली जैवविविधतेची उधळणच , त्यामुळेच की काय त्याला Estate वैगरे म्हणत असावेत। भोवताली डोंगर , दोन्ही बाजूला गर्द झाड़ी , सुन्दर  कॉफीचे म ळे , वळणा वळणावर  डोका वणारी  कावेरी नदी & त्यावर  टाकलेले पूल , &अश्या चढ़ उतरणीच्या रस्तात असणारी छोटी छोटी घरे किंवा "Home Stay" पुरविणारी घरगुती हॉटेल्स  म्हणजे  मडिकेरी किंवा विराजपेठ ही  कोडागुमधील मुख्य पर्यटक ठिकाणे।

साधारण "पर्यटन स्थळाला भेटी (Tourist Destination)" हा जो प्रकार असतो  त्याची मला धास्ती आहे कारण "दत्तदिन्गंबर किंवा साई दर्शन  छाप टूर मध्ये पाहण्यापेक्षा "पाहिले " हा Tick mark जास्त महत्त्वाचा असतो  अणि दूसरी भीती जी मला शाळेपासून छळते  ती म्हणजे  ही प्रेक्षणीय  ठिकाणे पाहिल्यावर सांगा पाहु "अमुक अमुक ठिकाण समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहे " किंवा " आपण पहिलेल्या राजवाड़ा कुठल्या राजाने किती साली बांधला अणि तो कुठली बांधकाम शैली वापरून बांधला " असली बौद्धिके।  आता आपण शाळेत नाही त्यामुळे  तो राजा , त्याचा राजवाड़ा , ती सनावळ  आपली शाळा  करणार नाही हे मनाशी पक्के ठरवून "sightseeing " पाहून अणि ऐकून  काढले।

 कधी तिथे "Abbey Falls / Irupu  Falls  " चा "वॉलपेपरला " शोभेल असा जीवंत नैसर्गिक देखावा ,  पाण्याचा गारवा मन मोहुन गेला।  तर कुठे "मंडलपट्टि "ची  Rough जीप Ride  निराळाच जीवनानुभव देऊन गेली। " भागमंडलच्या "देवळाच्या  परसातील त्रिवेणी संगम "आमच्या तुळापुरची" आठवण करुन गेला।  "तलकावेरी " च्या निसर्गरम्य परिसरात आदि काळापासून पाण्याचे महत्त्व अणि त्याचा रोजच्या आयुष्यातील अविष्कार म्हणजे जीवनदायी कावेरी नदी  व तिचा उगम हे पाहताना " Utility " ते " Deity" पर्यन्त कावेरी अम्माचा प्रवास डोळे भरून पाहता आला। "आले देवाजीच्या मना .. " च्या धर्तीवर प्रत्यक्ष ब्रह्मदेवच्या विनंतीने कावेरी माता तिथे प्रकट झाली असे मानतात , हे कळल्यावर अणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहिल्यावर " कावेरी " अम्माच्या " Beauty Consciousness" चा हेवा वाटला।

निसर्गाची जैवविविधतेच्या संपत्तीची   उधळण डोळे भरून पाहिल्यानंतर आम्ही मोर्चा वळविला तो मानवनिर्मित " Coffee & Spices" Estate कड़े।   २३० एकरात पसरलेली ती बाग आमचा टूर गाइड व्यवस्थित  समजावून सांगत होता , कॉफीची झाड़े , त्याचा हंगाम , त्याचे प्रकार (Arabica & Robusta) या बरोबरच वेगवेगळ्या मसाल्याच्या जाती , त्याची रोपे हे अगदी सोदाहरण दाखवत होता।  विडाच्या पानांसारखी दिसणारी मिरिची  पाने & त्याची फळे (Black Pepper), कर्दळीच्या पानांसारखी दिसणारी " वेलदोड्याची  रोपे" ( Cardamom) , Vanilla  चे रोपटे, दालचीनीची झाड़े किंवा तमालपत्र  (Cinnamon Tree  & its  leaves ) अशी शहरी माणसासाठी किराणा मालाच्या दुकानातून पॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तूंची झाड़े पाहून काढली।  त्या आनंदात असतानाच , एका नकळत्या क्षणी त्या टूर गाइडने प्रश्न केला, तो असा  " या कॉफीच्या बागेत काम करणाऱ्या पुरुष अणि स्री कामगाराला किती पगार मिळत असेल & कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात  बोनस किती मिळत असेल ? ". आकड़ेच लावायचे असल्याने बरेच लोक हिरिरिने भाग घेत होते।  सर्वांचे अंदाज बांधून झाल्यावर त्या गाइड ने जी माहिती दिली ती  विचार करायला लावणारी होती।  स्री किंवा पुरुष कामगार दिवसाच्या रोजन्दारीवर तेथे काम करतात।  दोघांनाही सारखा भत्ता (Daily Wages) दिला जातो अणि कॉफी फळे तोडण्याच्या हंगामात बोनस पण पूर्णत: किती किलो कॉफी फळे गोळा केली त्याच्या प्रमाणात दिला  जातो। स्री किंवा पुरुष कामगार जर समसमान फळे गोळा करत असेल  तर बोनस सारखाच। मला वाटले हा बागमालक दयाळू वैगरे असेल (हल्लीच्या भाषेत Compassionate Capitalist),पण  मग नंतर कळले की भारतातील ७० % कॉफी ही कूर्गच्या परिसरात लावली जाते अणि सगळीकडे असेच भत्ते (Daily Wages ) दिले जातात। तेव्हा मात्र  मनात घोळ णाऱ्या त्या विचाराने उचल खाल्ली अणि सहज कुतूहल म्हणून  तिथल्या स्थानिक लोकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला।

जैवविविधतेसाठी (Biodiversity) प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाने  लोकसंख्येच्या वैविध्यतेमध्ये पण ( Population Diversity ) आपला अग्रक्रम  टिकविला आहे (Sex Ratio : 1019 Women Vs 1000 Men ) अणि  साक्षरतेच्या ( Literacy  Rate )बाबतीत ८० % हुन अधिक लोक साक्षर आहेत।  या स्थानिक लोकांना "कोडावा" म्हणतात।  निर्सगाने रसरसलेल्या या प्रदेशात अर्थातच हे लोक  निसर्गप्रेमी अणि शेतकरी आहेत।  धर्माने ते हिन्दू असले तरी देव देवतांचे ( कावेरी अम्मा सोडून ) पूजन न करता आपल्या पूर्वजांना देव मानून त्यांची पूजा करतात।  पूर्वजांच्या आठवणीसाठी त्यांच्या घरात आपल्याकडे आपण देवासमोर जसा दिवा लावतो तसा दिवा  पूर्वजांच्या फोटोपुढे तेवत असतो। घरच्या वरिष्ठ स्रीला कुटुंबप्रमुखाबरोबरच  दिशादर्शकाचे काम करावे लागते कारण या लोकांच्या सामाजिक अणि धार्मिक विधी मध्ये  पुरोहित , पोथ्या , देव  यांना स्थान नाही। परंपरा , चालिरीति या मौखिक आहेत ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त होतात। त्याचा फायदा असा आहे की "उगाच----शास्त्रों में लिखा है ---" च्या नावाखाली रुढि परंपरांचे गुणगान नाही तर  काळाप्रमाणे  बदलण्याची लवचिकता दिसते।  मुलगा मुलगी एक आहेत त्यामुळे " लग्नात कन्यादान वैगरे होत  नाही ". जी गोष्ट  सामाजिक चालिरितींची  तीच त्यांच्या पोशाखाची अणि खानपानाची।  असे म्हणतात की हे लोक " born naturists" आहेत त्यामुळे  शेतात पिकणारे तांदुळ  व त्याचे वेगवेगळे प्रकार , बरोबरीला मसाले युक्त  पंधी करी (Pork Curry), अक्की रोटी ( तांदळाची ) हाच मुख्य आहार।  पोशाख पण शेतात काम करताना सोपे जावे असा।  ही लवचिकता इतकी स्रियांचा पदर घेण्याची अणि साडीच्या नीरा घालण्याची पद्धत अशी जी ज्यामुळे भात शेतात किंवा कॉफी बागेत काम करताना दोन्ही हात  मोकळे  राहावेत।  "Productivity Index " मध्ये हा समाज भलताच Efficient निघेल। ते करताना पण "Arabica " कॉफीचा तरल भाव & " Robusta " कॉफीचा robustness यांचा सुन्दर समतोल आढळतो।

तेच रहस्य आहे त्या कॉफी बागेतील "Equal Pay " मध्ये।

मनात विचार आला की " India " मधील वर उल्लेखलेल्या Diversity Expressला  अजुन जोरात धावण्यासाठी ऊर्जा  अणि " भारत " या संकल्पनेतील " स्रियांचा रोजगारातील सहभाग " वाढविण्यासाठी  स्फूर्ति देण्याचे काम  करण्यासाठी गरज आहे  ती "Look South" पॉलिसीची।

हे लिहताना कुठे तरी मराठी म्हणून माझा उर भरून येतो कारण याच साठी ( स्री शिक्षण & सबलीकरण )  क्रांतिज्योति सावित्रीबाई फूल्यांनी धर्ममार्तण्डांकडून दगड धोंडे खाल्ले होते , अवहेलना सहन केली होती . महर्षि कर्वे यांना  याच  कामासाठी सामाजिक बहिष्कार अणि उपास सहन करावा लागला होता। "याच साठी केला होता अट्टाहास " म्हणत केलेल्या प्रयत्नरूपी झाडाला लागलेली  फळे पाहून  आज ते नक्कीच सुखावले  असते। 

मागच्याच आठवडयामध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची १८९  वी जयंती साजरी झाली।  त्या माऊलीला आदरांजली म्हणून हा  " Blog ."

Happy New year to all of you!



Saturday, 14 December 2019

                                                   नित्यानंद  अणि नामस्मरणाचा रोग 

गेल्या दोन -तीन आठवड्यामध्ये  कुठल्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या  घटना घडल्या।  एक होती हैदराबाद मध्ये झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार अणि हत्येची।  महिला सबलीकरणाच्या काळात  अशा  घटना चीड़ निर्माण करतात अणि त्यामुळे साहजिकच हैदराबाद पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपींचे एनकाउंटर( मानवाधिकार वैगरे आचरट कल्पनांना भीक न घालता) केले ते निश्चितच कौतुकास्पद।  दूसरी अणि तितकीच महत्वाची बातमी म्हणजे " ए राजशेखरन " या नावाच्या माणसाने इक्वाडोर किंवा केमन आइलैंड च्या दरम्यान असलेले एक बेट (island ) विकत घेऊन स्थापन  केलेला छोटा देश (micronation ) म्हणजेच "कैलास ". ज्याला स्व:तचे   मंत्रिमंडळ (कॅबिनेट ) , पंतप्रधान आहे अणि  या राष्ट्राचा स्व:तचा ध्वज असून  जगातील सर्व  हिंदू लोकांसाठी (जाती पाती विरहित )  ज्यांचा धार्मिक आस्था विशिष्ट असल्यामुळे जगभरात छळ (percecuated) होतो आहे त्यांना  सुखाने आपल्या धर्माचे पालन करता यावे म्हणून स्व:तला  शिवभक्त (shaivite ) म्हणवणाऱ्या लोकांनी  चालू केलेले राष्ट्र। "

भारत हा देश सेक्युलरच (?) आहे की त्याची वाटचाल हिन्दू राष्ट्राच्या मार्गाने चालली आहे यावर प्राइम टाइम चर्चा झड़त असताना  जगात निर्माण झालेले  हे पहिलेच छोटे हिन्दू राष्ट्र(micronation )।  ज्या Citizen Amendment Bill " च्या माध्यमातून भारत सरकार शेजारी देशातील माइनॉरिटीला  सामावून  घेण्यासाठी असेच काहीसे करू इच्छित आहे, तसाच हा  प्रकार।  आता तुम्ही म्हणाल या दुसऱ्या बातमीचा पहिल्या हैदराबादवाल्या बातमीशी काय संबंध।  

निश्चितच आहे तो असा :

"ए राजशेखरन" हा ४२ वर्षीय माणूस दूसरा तिसरा कोणी नसून बलात्कार अणि लहान मुलांचे शोषण अशा गंभीर गुन्हांमध्ये  अटक वारंट असलेला "स्वामी नित्यानंद ". 'नित्यानंद ध्यानपीठ' च्या नावाखाली  आपले धार्मिक दूकान थाटलेला  स्व:तला शिवभक्त वैगरे म्हणवणारा श्रीमंत भोगी।  यातील गंमत पहा ज्या शिवभक्तीच्या नावाने याने आपले दूकान थाटले अणि जो मूळचा कैलासवासी ( Original Kailasaite  ) आहे तो शंकर सुखी स्थिर सांसारिक जीवनपेक्षा  भणंगपणताच (Wanderer's Life )  रमणारा व खऱ्या अर्थाने " विध्वंस अणि  निर्मिति " च्या खेळाचा सूत्रधार।  त्याचा हा तथाकथिक भक्त म्हणजे  योग्याच्या वेशातील  राक्षसच।  त्याची प्रवचने म्हणजे आचरट पणाचा कळसच।  तर काय  म्हणे याच्या कड़े एवढी आध्यात्मिक शक्ती आहे की  तो " सूर्योदय ४० मिनिटे उशिरा करू शकतो " किंवा " गाय किंवा इतर पशुंना संस्कृत अणि तमिळ मध्ये  बोलायला लावू शकतो " किंवा " त्याच्या ८२ (अंध)भक्तांना  त्याने तिसरा डोळा उघडून जग दाखविले ". या सर्वांवर  कड़ी म्हणजे  नोबल पारितोषिक विजेता Einstein  कसा चूक आहे आणि physics  हा विषय त्याला कसा कळला नाही   यावरचे  विवेचन।   


आता तुम्ही म्हणाल असल्या वेड्याच्या मागे कोण लागेल , तर तो तुमचा गैरसमज ठरेल।  सामान्य गरजू लोकांपासून ते  सिनेअभिनेती  (Actress ) ,राजकीय पुढाऱ्यांपर्यंत बरेच लोक याचे भक्त।  तसे  पाहिले तर धार्मिक दुकानदारीचे एक नवे बिज़नेस मॉडेलच अलीकडे तयार झाले आहे। सुरवातीला  प्रवचने , जत्रा मेळावे या माध्यमातून  साध्या भोळ्या भाबड्या  धार्मिक लोकांमध्ये आपले बस्तान बसवायचे।  अन्नछत्र , जमलेच  तर शाळा , रुग्णवाहिका , हॉस्पिटल्स  अशा सामान्य माणसाच्या निकडीच्या सोयीसुविधा अल्पदरात  किंवा फुकटात  देऊन ते अधिक दॄढ करायचे।  एकदा का गर्दी जमायला लागली की तिथे " गर्दी तिथे पुढारी " या न्यायाने नेता नावाची जी जमात आहे ती प्रकट होते , मग त्या परोपकारी (?) लोकप्रिय  बाबाला राजाश्रय मिळतो।  Glamour  च्या जगात असणारी स्पर्धा किंवा relevant  राहण्यासाठीची धडपड तिथे काम करणाऱ्या लोकांना सतत तणावाखाली ठेवते , त्यातून येणारी असुरक्षितता , व्यसनाधीनता , एकटेपणा किंवा आपल्या आयुष्याचा 'अर्थच काय'  पर्यन्त गेलेली  टोकाची निराशा यावर  " जीवनाचा  खरा अर्थ " समजावून सांगण्याच्या  गोंडस नावाखाली नवनवीन आध्यात्मिक गुरुंची गरज पडतेच ,मग लोकाश्रय मिळालेले बाबा  लोक ती जागा घेतात अणि सुरु होतो एक पंचतारांकित आध्यात्मिक प्रवास।  मग हे लोक देशोदेशींच्या लोकांच्या "Enlightenment " साठी " इंग्लिश "मधून अध्यात्म पाजळतात। त्यांचे हे पंचतारांकित भक्त लोक मदिराक्षीच्या संगतीत बाबा कसे ग्रेट आहेत अणि त्यांनी साध्या भाषेत कसे "Enlight " केले असे "lightening speed " मध्ये बरळतात।  याचाच पुढील टप्पा म्हणजे अशा देशी विदेशी भक्तांचे होणारे शोषण , कधी ते भोळ्या भक्तीचे आड़ केले जाते तर कधी "Enlightenment With   Master  Programme " च्या नावाखाली "Contractual  agreement " वैगरे करून रीतसर होते , बर इतर वेळी "Hotel चा Feedback  Form " पण कर्तत्व कठोर पणे भरणारा माणूस बाबांवरच्या (अंध)विश्वासपायी काहीही न वाचता  तो फॉर्म भरून सही करून मोकळा होतो अणि पश्चतापाच्या बंधनात अडकतो। कधी तो बाबा "आसाराम "असतो , कधी "बाबा राम रहीम " असतो, तर कधी " नित्यानंद "असतो।  नावे वेगवेगळी , भक्तीच्या नावाखाली दुकाने चालविण्याचा धंदा सारखाच।


हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की पुन्हा पुन्हा फसवणूक होऊन देखील दर खेपेला नव्या बाबाला नमन करण्यासाठी आपण पुढे का असतो याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे  असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ।  Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर  भरोसा  असलेला असा भाबडा भाविक  म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव  किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून देऊ म्हणणाऱ्या  बाबा लोकांचा "Target audience " असतो।  मग हे भूतलावरील देव स्व:तलाच Almighty वैगरे  समजून  शोषणाला सुरवात करतात।

तसेही आपल्याकडे थोर माणसांना "देवत्त्वाच्या" चौकटीत बसविण्याचा प्रयत्न कायमच होत राहिलेला आहे कारण या चतुर लोकांना  पक्की कल्पना आहे की एकदा का एखाद्या माणसाला देव केले की "विचारांच्या सामर्थ्यावर  होणारे मूल्यमापन मागे पडून भक्तीच्या वाटेने  केले जाणारे गुणगान "चालू  होते। भक्तीचा राग विचारांच्या लढाईत जिंकून नेतो। कृतीपेक्षा चमत्काराचे "Attraction " त्यात भर घालते।

म्हणजे बघा
  • ज्या "भिक्षुकशाहीच्या विरोधात " महात्मा फुल्यांनी आवाज उठवला  त्यांची जयंती किंवा पुण्यथिति "सत्यनारायण "घालून , "फोटोची पूजा" करून  अणि " प्रसादाच्या जेवणावळी घालून " साजरा करण्यासारखे त्यांच्या विचाराचा पराभव तो कुठला। 
  • "रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले " किंवा " भिंत चालवून दाखविली " असल्या चमत्कारातच ज्ञानेश्वरांचे मोठेपण आहे असे मानणाऱ्या किती लोकांनी   "पसायदान " किंवा "ज्ञानेश्वरी "समजण्याचा प्रयत्न केलेला असतो। 
  • "कागदी लिहिता नामाची साखर /चाटिता मधुर गोदी नेदि। " असे "Practical "अभंग लिहणाऱ्या तुकोबांचे भक्त "पाण्डुरंगाचे"  लाख लाख वेळेला नाव लिहा म्हणजे अमुक  गोष्टी होतील , संकटे दूर होतील असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे हे कळेनासे होते। 
  • पुरोगामी अणि सेक्युलर म्हणणारे लोक सावरकरांचा द्वेष करतात , पण " गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे " किंवा "शेण अणि मलमूत्र यांच्या सहवासात गोठ्या मध्ये राहणाऱ्या गाईची पूजा सोवळे पा ळून, शुचिर्भूत झालेल्या बाईने  का करावी " किंवा " ज्ञानेश्वरांनी जर भिंत चालवली असेल तर अलाउद्दीन खिल्जीच्या सैनिकांना त्यांना  का रोखता आले नाही " या असल्या  त्यांच्या प्रश्नांवर भले भले पुरोगामी प्रतिगामी होतात।   
  • शिवाजीचा उल्लेख करताना "छत्रपती शिवाजी महाराज "असाच झाला पाहिजे असे आग्रहाने  सांगत फिरणारे राज्यकर्ते  जातिपातीचे राजकारण करण्यात इतके गुंतलेले आहेत की " रयतेचा उद्धार " किंवा " बहुत जनाचा आधार " असल्या   भानगडित न पडता "मराठा " तितुका मेळवावा  म्हणताना कुठला "महाराष्ट्र धर्म " जाणतात हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे चांगले काम करणाऱ्या  माजी मुख्यमंत्राची जात महत्वाची ठरते काम नव्हे। 
थोडक्यात काय तर विचार अणि आचार या मध्ये समन्वय साधणे बऱ्याच लोकांना शक्य नसते तेव्हा  देवत्त्वाची चौकट अणि नामस्मरणची सजावट जगणे सोपे करते।

आता तुम्ही म्हणाल  सध्याच्या जागतीकरणाच्या  युगात देखील "नामस्मरण " जरूरीचे ठरते का किंवा "सेक्स पासून संस्कारा पर्यन्त"  खुल्लम खुल्ला चर्चा करणारी पिढी याच्या आहारी  कितपत जाईल।  त्याचे उत्तर " VUCA " या  concept मध्ये आहे।  Vulnerability , Uncertainty , Complexity  अणि  Ambiguity या  चार गोष्टींनी आपले जग व्यापलेले आहे।   संसाधने (Resources) &तंत्रज्ञान (Technology), संधी (Opportunities ) यांची असणारी  मुबलक उपलब्धता, जगण्याची स्पर्धा (Competition)  पण तितकीच तीव्र करत आहे.  " दोन पंच अणि लंच " किंवा " दोन  सह्या अणि वह्या " असे असणारे जॉबचे स्वरुप बदलून सतत नविन नविन स्किल आत्मसात करताना लागणारी गतिशीलता (Pace of life) ठेवताना  होणारी दमछाक  प्रत्येक तरुणाला किंवा तरुणीला विसावा शोधायला भाग पाडते। तो विसावा बहुतेकदा " नामस्मरणच " असते। 

यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता  तर  म्हणजे " स्व:ची ओळख " अणि त्यासाठी केलेला प्रवास। व "एकमेका सहाय्य करुँ। अवघे धरु सुपंथ। " असे  म्हणत  चालणारे "participative" समाजजीवन  पुन्हा अनुभवणे  जे आपण  मागे  सोडून   " जीवो जीवस्य जीवनम :" ( one living is food for another) हा  जंगलाचा कायदयाचे  पालनकर्ते झालो आहोत। 

ज्यांना या पुराणातील गोष्टी  वाटतील  त्यांनी  आंतरराष्ट्रीय  पातळीवर सध्या जोरात असणारे "इकीगाई"  हे जापनीज (Japanese ) तत्वज्ञान जरूर वाचावे। आनंदी अणि तणावमुक्त जीवनासाठी  ज्याची सर्वात जास्त गरज आहे ते म्हणजे " आपला इकीगाई " शोधण्याची  म्हणजे काय तेच  " तू स्व :त ला ओळख अणि सर्वांशी प्रेमाने बंधुभावाने वाग "

थोडक्यात काय "बाबा नित्यानंदाच्या " भाषेत बोलायचे झाले तर " नामस्मरणाच्या आज़ारातून  बरे होण्यासाठी वरचा उपाय म्हणजे " Breath of Solution " आहे , "Depth  of solution " कळण्यासाठी चला निघुया प्रवासाला "स्व:तला ओळखायला। "








Saturday, 7 December 2019

                                                               पाहता समाज 

२०१९ हे वर्ष सरत आलेले असल्याने अणि "Thanksgiving" चे सोपस्कार झाल्यानंतर  मागच्या आठवड्यामध्ये ऑफिसमध्ये  जरा  निवांत वातावरण  अनुभवायला मिळाले।   २०२० साठी बाह्या सरसाहून कामाला जुंपणापूर्वी  "Enjoy The Festivity " किंवा " Spend Time With your Family " च्या गोंडस नावाखाली मिळालेले काही विसाव्याचे क्षण  अणि त्याबरोबर येणारे खुमासदार "Canteen  Sessions ". जिथे संवाद हा  समोर असलेल्या माणसाला "headcount " समजून  केलेला नसून तो जीवनातील सहयात्री (Companion) म्हणून केला जातो अणि मग  एक मस्त मैफिल जमून जाते।  असाच योग मागील आठवड्यामध्ये आला।  कुणी जानेवारी मधील  मुंबई मॅरेथॉनची तयारी वर बोलत होते तर कुणी "kick boxing " मध्ये किती लाथा खाल्ल्या याचे सहभिनय वर्णन करत होते।  कुणी  नुकत्याच केलेल्या ट्रेकिंगची हकिगत सांगून समोरच्या अंगावर रोमांच उभे करत होते। तर माझ्यासारखे बैठ्या प्रवृतीचे लोक काय नवीन वाचले किंवा कुठले नवीन पुस्तक "स्टोरीटेल App " वर ऐकले ते सांगत होते। तेवढ्यात चेहऱ्यावर कुतूहल अणि आश्चर्य याच्या मिश्रणातून होणारे भाव दाखवत एका सहकाऱ्याने प्रश्न केला "तू वाचतोस ? "वाचन कला किंवा वाचणारा समाज हीच एक दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे  त्यामुळे प्रश्र काही अगदीच चुकीचा नव्हता। 

माणसाला मनुष्यप्राणी असे पण म्हटले जाते कारण भय ,भूक ,भीती, तहान या भावना माणसामध्ये सुद्धा प्राण्यांप्रमाणे असतात  त्याला मनुष्य बनविण्याचे काम करते  त्याचे कुतूहल। कुतूहल नावाचे हे रसायन अजब आहे जे  त्याला  एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला भाग पाडते , त्याचा पाठपुरावा करायला लावते।  अडखळणे , धडपडणे , यश , अपयश , एखादी गोष्ट सापडण्याचा आनंद किंवा अपेक्षाभंगाचे दु :ख  अशा सर्व भाव भावनांनी  संपन्न जीवनानुभव  ( Life Experience)घ्यायला भाग पाडते।  या भावनेतून आचार विचार , भाषा , धर्म , राजनैतिक जाणिवा  अश्या प्रवृत्तीचे दुवे जोडले जातात  ज्यातून काही बंधने स्वखुशीने स्वीकारून राष्ट्र नावाची गोष्ट आकार घेते। राष्ट्रीय अस्मिता निर्माण होते।आपल्या जगण्याला विशेष अर्थ आहे हे दाखविणारे  सांस्कृतिक विकासाचे टप्पे गाठते।  साहित्य , कला निर्मिति होते , ज्यातून जगण्याच्या प्रेरणेची माहिती मिळते।  हे कुतूहल शमविण्यासाठी , आणि संपन्न जीवनानुभव  अनुभवण्यासाठी  साधन असते ते म्हणजे " वाचन " & ते उपलब्ध व्हायचे " पुस्तकातून " अणि म्हणून "शहाणे " होण्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण अणि पर्यायाने "वाचन " ही गेल्या काही शतकांची मळलेली  वाटच म्हणा ना।

त्यातूनच  मग "वाचाल तर वाचाल " किंवा " चार बूके शिकलास तर काय लै शहाणा झालास हो " या सारखे उपदेश किंवा सुसंवाद आपल्या परिचयाचे आहेत।  वाचनातून  ज्ञान मिळते, गोष्टी समजतात  हे आपल्या मनावर इतके बिंबले आहे  की एखाद्या माणसाबद्दल  मत व्यक्त करताना  आपण सहज म्हणून जातो की "माझे त्या माणसाबद्दलचे "Reading " अमुक अमुक आहे।  समृद्ध  जीवनासाठी  लक्ष्मी (पैसा ) बरोबर सरस्वतीची (ज्ञान, पुस्तके ) उपासना पण तितकीच गरजेची आहे  हे किती जरी ठासून सांगितले तरी प्रत्यक्ष वास्तविकता ही काहीशी वेगळी आहे। लक्ष्मीपुत्रांची  समृद्धी( ;यश , कीर्ति , पैसा ) मिळविण्यासाठी चाललेली स्पर्धा ही मोजून मापून केलेल्या सरस्वती पूजनावर आधारित आहे। "अपेक्षित प्रश्न संच ","वर्गातील सहकाऱ्याच्या नोट्स ", ऑफिस मधील प्रेजेंटेशन साठी बनविले जाणारे "Talking Points"  ही आपण सर्वांनी अनुभवलेली मोजून मापून सरस्वती पूजनाची काही ठळक उदाहरणे। खरे म्हणजे आपल्यापैकी बहुतेकाना "वाचन " या गोष्टीचा प्रचंड कंटाळा असतो।  आपला देश जसा क्रिकेट खेळण्याबरोबरच  " बघणारा किंवा बोलणारा" पण देश आहे तसेच  वाचन " जरुरी है "म्हणत  त्याचा प्रचंड कंटाळा असणारा अणि सार्वनजिक जीवनात तो न्युनगंड लपविण्यासाठी धडपडणारा वाचनप्रेमी (?) देश आहे। अरे काल "Cross World" मध्ये  मस्त नविन पुस्तक पाहिले असे सांगणारे ८०% लोक तिथे A. C ची  थंड हवा  अणि वाफाळती कॉफ़ी  याचा आस्वाद  अधिक घेतात।   अशा पुस्तकांच्या दुकानात जर तुम्ही नजर फिरविली तर तुमच्या लक्षात येईल की खुप लोक एखादे पान वाचून इकड़े तिकडे सौंदर्य (?) न्याहाळन्यात जास्त गुंतलेले असतात।  बळेच आपण पण वाचतो हे दाखविण्याचा तो एक अट्टहासच।

अशा  परिस्थितीत  जर आपण शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर  बहुदा " वाचनाला " असलेले  अवास्तव महत्त्व  आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही।  आपण वाचतो म्हणजे नक्की काय तर

  • " पेपर " वाचून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती घेतो।  
  • "अग्रलेख (Editorial )" वाचून  अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक , राजकीय , आर्थिक बाबींवर आपले मत बनवितो  किंवा आपला विचार त्या लेखाबरोबर तपासून पाहतो। 
  • "प्रवासवर्णन " वाचून घरबसल्या जगाच्या सफरीचा अनुभव  अणि आनंद घेतो।
  • "कथा ", "कांदबरी " किंवा " इंग्लिश वाङमयाचे भाषांतर " यातून  वेगवेगळ्या  घटना , माणसे , अनुभव , कल्पना  यांची माहिती करून घेतो 
  • "शालेय पुस्तके " वाचून  आपण विषय शिकतो अणि परीक्षेची तयारी करतो 
  • " Cooking Recipe " ची पुस्तके गृहिणींना चवदार पाककृतींची ओळख करून देतात।
  • " Online Blog" वाचन त्यातील विविधतेमुळे आकर्षित करते। 

थोडक्यात काय तर एखादा विषय समजावून सांगून त्याला अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेला "वाचन " म्हणतात।

आता या स्मरणरंजनातून बाहेर पडून " जियो जी भरके " च्या दुनियेत आपण केलेला प्रवेश म्हणजे " वाचणारा समाज " ते " पाहणारा समाज " असा प्रवास आहे। आजकाल "Updated" राहण्यासाठी सकाळच्या पेपरची  वाट पहावी लागत नाही।  मिनिटा मिनिटाला येणारे ऑनलाइन अलर्टस आपल्याला सतत "alert " ठेवतात। राजकीय , सामाजिक किंवा आर्थिक घडामोडींवर  मत जाणून घेण्यासाठी आता अग्रलेख (Editorial ) बरोबरच " Cut the Clutter " सारखे १५-२० मिनीटाचे वीडियो उपलब्ध असतात किंवा "Knapilly " सारख्या app वर " एखाद्या बातमीचा "(Why/ What/ When/ How)सर्वांगाने आढावा घेतलेला असतो।  गणिताचे थेरम  पुस्तकातून पाठ करण्यापेक्षा " Byju 's लर्निंग App वर ते चित्रमय भाषेत उपलब्ध असते।  एखाद्या मुलाला काही गोष्टी कळल्या नाहीत तर त्याला समजेल अश्या वेगात तो मुद्दा समजावून देऊ शकणारे "Video on demand at our own pace" सारखे पर्याय समोर आहेत।  "Blog " वाचायचा कंटाळा आला तर blog writer चा  आपले म्हणणे सांगणारा "Video " पण आजकाल  मागणीत असतो किंबहुना "blog " च्या वाचकांपेक्षा " blog Video " पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे। " अपूर्वाइै " किंवा " जावे त्यांच्या देशा " ही पुलंची पुस्तके वाचून जग प्रवास अनुभवणारी  पिढी मागे पडून " Fox Life " / "Travel XP " पाहून , " भा डी पा " सारख्या ऑनलाइन पोर्टलवर  डोळ्यांनी घरबसल्या जग पाहणारी पिढ़ी आज मजा करत आहे। " Cooking Recipe" च्या पुस्तकाची जागा " Cooking Shows " ने घेतली आहे।

माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे खरेच पण ही जी "दृकश्राव्य (Audio visual)" क्रांति त्याने केली आहे त्याने अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेतुन " वाचनाला " मागे टाकून "पाहण्याला " अग्रक्रम दिला आहे. पाहणे या शब्दाला निराळेच वलय  प्राप्त झाले आहे। कदाचित त्यामुळे आता भविष्यात " मी तुला पाहून घेईन " याचा निराळाच अर्थ निघू शकेल।

या पाहणाऱ्या समाजासाठी  रामदासांच्या भाषेत इतकेच म्हणेन :

" जे जे आपण पहावे।  ते ते दुसऱ्याशी फॉरवर्ड करावे। 
    पाहून ऐकुनि शहाणे करावे। सकळ जन। "


Saturday, 19 October 2019

सहकार महर्षी का मेट्रोमॅन ?

महाराष्ट्राच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आज समाप्त झाली। नवीन लोकप्रतिनिधी व प्रशासन निवडण्यासाठी मतदारराजा आता सज्ज झाला असून येणाऱ्या २१ तारखेला तो आपला निर्णय मतपेटीतून व्यक्त करेल। साहजिकच या निवडणुकीत काय  होणार " महायुतीचे " २/३ बहुमताचे सरकार येणार की विरोधी पक्ष म्हणतात त्याप्रमाणे जो "undercurrent " किंवा  सध्याच्या राज्यकर्त्यांच्या बद्दल असणारा राग   सत्तापरिवर्तन करून दाखविणार। या साठी फार नाही  पण  २४ ऑक्टोबर पर्यन्त वाट पहावी लागेल। 

मला मात्र ही निवडणूक  महाराष्ट्राचा नेता कोण या प्रश्नाचे उत्तर ठरवणारी आहे असे वाटते कारण या वेळी मला बरोबर पाच वर्षापूर्वी जेव्हा भाजपाचे सरकार "देवेन्द्र फडणवीस "यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाले तेव्हा "शेखर गुप्ता " या प्रसिद्ध पत्रकारने एका इंग्लिश वर्तमान पत्रासाठी लिहलेला लेख आठवला ज्यामध्ये  त्यांनी असे म्हटले होते की  फडणवीस यांच्या रूपाने  महाराष्ट्राला  असा नेता मिळाला आहे ज्याची स्व:तची ना सुतगिरणी (Textile Mill ) आहे ना साखर कारखाना( Sugar Factory ) ना पतपेढी (Credit Society ). थोडक्यात काय तर तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख बनलेल्या सहकार क्षेत्रापासून (Co-Operative Moment) लांब असणारा , नागपुर दक्षिण सारख्या शहरी मतदार संघातुन निवडून आलेला , नागपूरचे महापौर पद एवढाच शासनाचा अनुभव असणारा एक तरुण पण नवखा राजकारणी महाराष्ट्राची सुत्रे हातात घेत होता। सामाजिक अणि जातीय समीकरणात फिट्ट न बसणारा  हा  तरुण काय करू शकेल या बद्दल उत्सुकतेपेक्षा 
साशंकताच अधिक होती  . 

१९६२ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात आली पण त्याचे नेतृत्त्व खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रानेच केले। मग ते यशवंतराव चव्हाण असोत किंवा वसंतदादा  पाटील असोत , नेतृत्त्वाचा चेहरा हा कुठे ना कुठे  शेती, त्याचाशी निगडित जोड उद्योग , सहकार चळवळ  यांच्या रुपाने  ग्रामीण अर्थकारणाशी एकरूप झालेला दिसायचा।  यातून या नेत्यांच्या प्रदेशा पुरती विकासाची बेटे तयार होत गेली। अशा  जहागिरदार नेत्यांची मोठ बांधून राजकारभाराचा गाड़ा हाकला जात होता। आजच्या भाषेत सांगायचे तर  सत्तेतुन पैसा , पैशातून संस्था , अणि त्याद्वारे हक्काचा मतदार असा  निवडणुका जिंकण्याचा रामबाण उपाय होता तो। 

१९९१ नंतर आर्थिक उदारीकरणाने म्हणा किंवा  त्यानंतरच्या माहिती तंत्रज्ञानच्या क्रांतिने अणि उद्योगस्नेही धोरणामुळे शहरीकरण वाढू लागले।  मुंबई , पुणे , नाशिक असा सुवर्णत्रिकोण (Golden Triangle ) तयार झाला  .  अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात  शहरात स्थलांतर करू लागेल। खा ऊ जा ( खासगीकरण , उदारीकरण , जागतिकीकरण ) संस्कृति मूळ धरु लागली।  त्या तरुणांची स्वप्ने वेगळी होती , त्यांच्या समस्या  निराळया  होत्या। त्यांचे प्रश्न हे पिण्याचे पाणी , महिला सुरक्षा, स्वस्तात घरे  ते  चांगली सार्वजनिक वाहतूक , चांगले रस्ते असे अत्यंत मुलभुत अणि रोजच्या जीवनाशी निगडित होते। दुर्दैवाने त्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रमुख राष्टीय  पक्ष कमी पडत होते।  नाही म्हणायला शिवसेनेसारखे काही प्रादेशिक पक्ष तो प्रयत्न सातत्याने करत होते , पण " मायबाप " सरकारच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्य प्रवाहातील कांग्रेस सारख्या पक्षाला  सरकारची बदललेली भूमिका जाणून घ्यायची इच्छा नव्हती।  ही संधी शिवसेनेसारख्या प्रादेशिक संघटनेने अणि त्याकाळी विशिष्ट जाती जमाती यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाने बरोबर हेरली।हाच शहरी नोकरदार वर्ग पुढे मतदाता म्हणून भूमिका बजावत असताना प्रस्थापित सत्तारूढ़ पक्षाच्या धोरणांमुळे  त्यांचे बंध  जोडले जाणे  थोड़े कठीण होते अणि बरेचदा तर  त्या "आम्ही दोघी " चित्रपटातील  खालील गाण्यासारखीच परिस्थिती होती 
" वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळ हे।
  का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे।

अशा अनुकूल वातावरणाचा फायदा  खरे तर विरोधी पक्षांना आपसूक झाला।  १९९५ साली आलेले  महायुतीचे सरकार ही त्या बदलत्या सामाजिक वास्तवाची चुणूक होती। आणिबाण ीसारख्या बिकट परिस्थितीत देखील  ज्या राज्याने कांग्रेसला भरभरून साथ दिली त्या महाराष्ट्रात साधे बहुमत व सत्ता  पण पुढल्या काळात आघाड्या करुन मिळवावी लागली । शेतीच्या समस्या  जसे की  दुष्काळ, सिंचन , शेतमालाला रास्त भाव  ,सहकार सारख्या अत्यंत सुंदर संकल्पनेत  घुसलेला भ्रष्टाचार हे प्रश्न जसे बिकट होत गेले तशी कांग्रेस ची राजकीय पकड सैल झाली , तेव्हाच  ती मोकळी जागा विरोधी पक्ष म्हणजे भाजपा , शिवसेना  २०१४ मध्ये व्यापू शकले व सत्ताधारी बनले । देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। 

ते "माणूस " चित्रपटातील  गीत आहे ना , फड़णवीसांची कारकीर्द अगदी तशीच आहे। 

" मन सुद्ध तुझ गोस्त हाय पृथिविमोलाची। 
तू चाल पुढे तुला रे गड्या भीति कश्याची , 
पर्वा भी कुणाची।

त्याप्रमाणे फड़णवीसांकडे राज्य चालविण्याची जबाबदारी आली होती।  गड़ी पण भलताच तयारीचा निघाला।  त्याने  रस्ते , पायाभूत सुविधा , शहरी सार्वजनिक वाहतूक प्रश्न मार्गी लावण्यासाठी "मेट्रो  योजना " या बरोबरीने "दुष्काळ , शेतकरी  आत्महत्या " अशा प्रश्नाच्या मुळाशी असलेले कारण नष्ट करण्यासाठी "जलयुक्त शिवार ", "सिंचन प्रकल्प  ", " पीक विमा " अश्या योजना या  दोन्ही आघाड्यांवर किल्ला यशश्वी लढविला। 

"झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला। 
काटकूट वाट मधि बोचति त्याला 
रगत निगल , तरी बी हसल , शाबाश तेचि। "

राज्य कारभार करताना अनेक आव्हाने  त्यांच्या समोर होती।  वाटेत काटे टाकण्याचा प्रयत्न कधी स्वकीयांंनी केला कधी विरोधकांनी।  मग तो  " ना णार प्रकल्प" असेल, " समृद्धि महामार्ग & त्यावर होणारे लॉजिस्टिक & प्रोसेसिंग पार्क "असेल   किंवा " मराठा मोर्चा अणि मराठा समाजसाठीच्या आरक्षणाचा विषय असेल " फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न खुप झाला।  पण संयम राखत समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत , हसत खेळत कधी चिमटे काढत गंभीर प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। 

"जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची"

जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो , मराठवाड़ा अणि आसपासच्या भागातील दुष्काळ नाहीसा करण्यासाठी नदीजोड़ किंवा धरण जोड़ प्रकल्पा सारख्या मूलभूत पर्यायांचा विचार , मराठा आरक्षण अश्या " Must Win Battle " ओळखणे अणि आपली उत्तम टीम त्या कामासाठी वापरणे अणि त्यांना पूर्ण सहकार्य करणे  हे नेता म्हणून फड़णवीसांचे मोठे वैशिष्ट।  त्यासाठी होणारा विरोध , कोर्टाच्या वाऱ्या , काही विशिष्ट लोकांकडून होणारी अड काठी यावर सकारात्मक पद्धतीने मात करणे ही त्यांची शैली। " समृद्धि महामार्ग & त्यावर होणारे लॉजिस्टिक & प्रोसेसिंग पार्क " हा रोजगार निर्मितीसाठी एक मैलाचा दगड ठरु शकेल। 


आता हे सर्व केल्यानंतर "या गड्याच्या गळ्यात विजयाची माळ पुन्हा पडणार  का  " हे मतदार २१ ला ठरवतील , पण कदाचित हीच ती वेळ ज्यावेळी महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलेल अणि "सहकार महर्षी " ते " मेट्रोमॅन" असा नेतृत्वाचा प्रवास कायमस्वरूपी झालेला दिसेल। 

चला तर मग २१ ऑक्टोबर ला मतदान करुया अणि भागीदार होऊया बदलता महाराष्ट्र व नेता  घडविण्यासाठी !





Saturday, 31 August 2019

अबब .... १. ७६ लाख करोड !

 दोन दिवसापूर्वी   मुलीच्या शाळेतले " वार्षिक स्नेहसंमेलन ( Gathering ) " पाहण्याचा योग आला।  मुला-मुलींनी बसविलेली नाटके , नृत्य  एकदम मस्त होते।  या निमित्ताने मस्त धिंगाना घालायचे परमिट मिळालेले त्यामुळे बच्चे कंपनी मजेत होती। शिक्षकांनी देखील खुप तयारी करून  घेतलेली असल्याने आपले नाटक किंवा नृत्य  चांगले करण्यासाठी प्रत्येक जण  खास काळजी घेत होते।  या मध्ये शिवाजी महाराज , गणपती  उत्सव , दुर्गा देवीची आरती अशा  पारंपरिक श्रद्धास्थानापासून ते  अगदी आजच्या काळातील दुष्काळ , स्री भ्रूण हत्या , नशाबंदी  या सामाजिक आशयावर  पण  मनाला टोचणी लावणारे भाष्य केले जात होते।  याच अंतर्गत "पोस्टर गर्ल " या चित्रपटातील    गाण्यावर  शाळेतील "सेकंडरी डिवीज़न " च्या मुलींचे नृत्य  खूपच रंगले  होते।  उत्साहात  छान नृत्य  मोबाइलच्या  कॅमेरात कैद करावे म्हणुन रेकॉर्डिंग करत असतानाच  " News Popups" अणि त्या पाठोपाठ " Whats app   messages "  चा भडिमार चालू झाला।  कारण होते   खालील  ब्रेकिंग न्यूज़ चे 

" RBI Bonanza:  INR 1.76 lakh crores to be transferred to Indian Government"
OR
" RBI Autonomy in danger:  Daylight robbery of  INR 1.76 Lakh Crores"
OR
" Lender of Last resort(RBI)  rescued Spender of last resort( Govt Of India) : Ifs and buts of INR 1.76 lakhs Crores"

मागे स्नेहसंमेलनतील नृत्य रंगात आले होते।  गाण्याचे  बोल  मला खुणावत होते अणि कुठे तरी मला त्या ब्रेकिंग न्यूज़ पर्यन्त खेचून आणत  होते। 

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी"

या वैकुंठरूपी भारत देशाचा कारभार चालविताना/देशाचे रहाटगाडघे   हाकताना     विठुरायाला ( मायबाप सरकारला )  उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ  घालत ( वित्तीय तूट )  सुखी संसार चालविणे एकट्याला अवघड होऊन बसले आहे .  संसार सुखाचा करण्यासाठी  म्हणजे देशातील लोंकांना सोयी सुविधा देण्यासाठी लागणारा निधी उभारणे गरजेचे आहे . अर्थव्यवस्था ओढग्रस्तीला लागलेली असताना  त्यात नवीन गुंतवणूक रुपी प्राण फुंकणे गरजेचे आहे , अशा वेळेला वरील गाणे म्हणजे  प्रजेने रखुमाईला (RBI) ला घातलेले साकडेच म्हणावे लागेल .  लाभांश (Dividend) रुपी  पावलांनी  रखुमाईने (RBI ने ) सरकारच्या तिजोरीत  ( विठूच्या गाभारी  ) आपले दान टाकावे  म्हणजे सरकार त्या गंगाजळीचा वापर  लोकपयोगी कामांसाठी करून  प्रजारुपी भक्तांना  रस्ते ,रोजगार , चांगले जीवनमान उपलब्ध करण्यासाठी कामाला लागेल . 

"RBI Dividend  म्हणजे काय रे भाऊ... " याचे सोपे उत्तर म्हणजे "RBI ने वर्षभरात कमविलेल्या नफ्याचा  काही वाटा  भागधारक (Shareholder) म्हणून  भारत सरकारकडे सुपूर्द करणे जेणे करून तो पैसा सरकारला  आपले काम करण्यासाठी वापरता येईल.   हा नफा RBI ने  त्यांची गुंतवणूक धोरणे  (  investment in Gold , Sovereign Bonds, Indian Govt. Bonds ) आणि त्यांचे  " रोकडसुलभता ( Liquidity Management ) , पतधोरण ( Credit Policy)  आणि देशातील  चलन ( तुम्ही -आम्ही  जे पैसे किंवा नोटा वापरतो ते ) पुरवठा (Currency Management) "अशा  देशाच्या आर्थिक  आरोग्याशी निगडित  गोष्टींचे  व्यवस्थापन यातून कमाविलेला असतो .

जसे कुठल्याही खासगी किंवा  सूचिबद्ध  आस्थापनांमध्ये ( Pvt Ltd co किंवा  Listed  entities),  झालेल्या नफ्याचा काही भाग लाभांश (Dividend) म्हणून  भागधारकांना ( Shareholders ) दिला जातो, तसाच हा प्रकार . वरकरणी पाहता यात काय विशेष , असा प्रश्न पडणे साहजिक आहे .तरी पण या वार्षिक  सोपस्कारावर एवढा गदारोळ किंवा चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्या लाभांशाची( Dividend)  भव्यता ( INR 1.23 lakh Crore) आणि  आपत्कालीन काळासाठी राखीव ठेवलेल्या पुंजीतून ( Contingency reserves) सरकारने स्वत:कडे वळते केलेले पैसे ( INR 53 lakh Crore) 

हे थोडेसे आपल्या घरोघरी पूर्वी असणाऱ्या आजीबाईच्या " जादूच्या बटव्याप्रमाणे " आहे . पूर्वी घरखर्चासाठी  पैसे दिल्यानंतर घरातील बायका त्यातील काही पैशातच  रोजच्या गरजा भागवून राहिलेला पैसा बचत करून ठेवायच्या . ते पैसे पण, घरी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या वाट्यामध्ये ठेवलेले असायचे . त्यामागील उद्देश म्हणजे अचानक येणाऱ्या संकटाच्या वेळी लोंकांपुढे हात न पसरता आपल्याकडील पैसे वापरता यावेत.  ती जशी 
आपत्कालीन काळासाठी राखीव पुंजी (Contingency reserves) असते , तशीच देशाच्या  पातळीवर RBI स्वतःच्या झालेल्या नफ्यातून काही  पैसे असे आपत्कालीन काळासाठी राखून ठेवते . ते किती ठेवावेत  आणि सध्या जी आर्थिक आपत्कालीन परिस्थिती आहे तेव्हा  त्या पुंजीतील पैसे काढून का वापरू नयेत या दोन मुद्दांवर  गदारोळ उठलेला आहे . 

हे विचार मनात चालू असताना गाण्याचे पुढले कडवे चालू झाले 

"तुझी थोरवी महान, तिन्हीलोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई"

RBI  म्हणून असणारी एक संस्थात्मक रचना , तिची स्वायत्तता , देशाच्या आर्थिक आरोग्याशी निगडित  गोष्टींचे व्यवस्थापन करताना  गरजेचे असणारे स्वातंत्र  याचा पण बराच उहापोह झाला . या RBI रुपी रखुमाईची थोरवी आणि  तिच्या कामाबद्दल जगात असणारा मान  या सर्व गोष्टी कुठे तरी  योग्य पद्धतीने हाताळल्या जात नाही आहेत असे  वातावरण तयार झाले .  ही मदत जर तुम्ही आम्हाला ,आम्ही म्हणतो त्या अटींवर केलीत तरच आम्ही तुमच्या स्वतंत्र , स्वायत्त अशा जगभरात नाव असणाऱ्या संस्थेची पालखी   वाहू  असे  सरकार सूचित करत आहे असे वातावरण तयार झाले . 


साहजिकच या मुद्दयावर राजकारण पण तापायला सुरवात झाली .  " दिवसाढवळ्या केलेली लूट " ते " नेहमीची शासकीय  पद्धती " अशा  दोन टोकाच्या प्रतिक्रियांच्या हिंदोळ्यावर हा अति महत्वाचा विषय अडकून पडला. 

यातील  गांभीर्य लक्षात घेण्यासाठी  "INR 1.76 Lakh Crores" याची व्यापकता लक्षात घेतली पाहिजे. ती कशी तर हा पैसा  किती आहे , तो जास्त आहे कि भव्य आहे हे तपासायचे झाले तर  एक गंमतीदार तुलना करता येईल 

या पैशांमधून  
  • दुपारी शाळेतून दिले जाणारे "Midday Meal " ही योजना पुढील १६ वर्षे चालविता येईल 
  • मनरेगा  ही जी ग्रामीण रोजगार योजना आहे ती  पुढील ३ वर्षें  चालविता येईल 
  • किसान सन्मान योजना (Farmer Income Scheme) ही पुढील २ वर्षे चालू ठेवता येईल 
  • १०८ राफेल विमाने एका झटक्यात खरेदी करता येतील 
  • १७६ चांद्रयान अवकाशात सोडता येतील 
  • ३५० बाहुबली  किंवा ५० अवतार सारखे भव्य  खर्चिक सिनेमे निर्माण करता येतील 
  • २ फुटबॉल वर्ल्ड कप  एकाच वेळी आयोजित करता येतील 

 साहजिकच  माझ्या  भावना  गाण्याच्या शेवटच्या  कडव्याप्रमाणे होत्या  

"तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर, होऊ दे ग उतराई "

RBI रुपी रखुमाईने  हा भव्य खजिना मायबाप सरकार साठी ( विठूरायाची) खुला करावा  आणि त्यातून प्रजेच्या हिता ची कामे चालू व्हावीत . 

कार्यक्रम संपून घरी येताना  जाणविले की खरी मेख  तर इथून पुढे आहे. 

तुकोबांनी म्हंटल्याप्रमाणे 

"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे 
उदास  विचारे खर्च करे ."

एकदा सरकारकडे  पैसा जमा झाल्यानंतर  उदास विचारे म्हणजे  अलिप्ततेने म्हणजे " राजकीय , भाषिक, जातीय " समीकरणे बाजूला ठेऊन ,  लोकानुयायी निर्णय न  घेता देशाला समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च करणे गरजेचे आहे .  आलेला  पैसे  रस्ते बांधणी , बँकिंग व्यवस्थेला भांडवल पुरवठा  अशा रोजगार निर्माण करणाऱ्या किंवा अर्थव्यवस्थेला गतिशील करणाऱ्या प्रकल्पामध्ये गुंतवला जाणे हिताचे ठरेल तोच पैसा जर वित्तीय तूट भरण्यासाठी  किंवा  अनुदान वाटपासाठी सरकारने वापरला तर राखीव पुंजीची चैनीसाठी केलेली उधळपट्टी ठरेल. 

या प्रमाणे जर विठुराया ( मायबाप सरकार ) वागला तर रखुमाई (RBI)पण  हा वैकुंटरूपी देश  आर्थिक ओढग्रस्तीतून बाहेर काढून पुन्हा एकदा  प्रगतीपथावर नेण्यासाठी  आपल्यापरीने मदत करतच राहील  

"सरकारला डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घेण्याची सुबुद्धी दे  " असे गजाननाला साकडे घालून आज इथेच थांबतो . असा विचार करून  संकल्प सोडण्यासाठी " गणेश चतुर्थी " पेक्षा दुसरा कोणता दिवस जास्त चांगला असेल .  

गणेश चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा ! "गणपती बाप्पा मोरया "!

Saturday, 24 August 2019

                                                         
                                                             खाण्याविषयी थोडेसे.....

अधिक खाण्यावरून खूप बोलणे ऐकल्यानंतर  आता मलाही मनापासून  खाण्याविषयी आपण पण काहीतरी बोलावे  असे वाटू लागले आहे।  आपल्याकडे म्हणतात ना "  एक वेळ नकटे  व्हावे  पण धाकटे  नको ", त्याच धर्तीवर " मठ्ठ असले तरी चालेल पण लठ्ठ नको " अशी काहीतरी लोकांची समजूत झालेली आहे।  माणूस लठ्ठ असणे याच्याशी त्याच्या "अधिक " खाण्याचा संबंध आहे असा एक सार्वजनिक गैरसमज आहे।  भरपूर , चापून खाणारी  कृश राहिलेली " पाप्याची पितरे " मी आजूबाजूला खूप पाहली आहेत। पापी माणसे बारीक़ असतात यावर भरपूर वर्ष हिंदी चित्रपट पहिल्यामुळे माझा तरी विश्वास बसत नाही। खलनायक लोक  पडद्यावर चांगल्या तंगड्या हाणताना  पाहून त्यांची पितरे कृश असतील यावर मी झोपेत पण विश्वास ठेवू शकत नाही। अविश्वास दाखवून स्वस्थ बसणे माझ्या चळवळया  स्वभावात बसत नसल्याने या विरुद्ध लठ्ठ लोकांची एक ऑनलाइन चळवळ उभी करावी किंवा फेसबुक पेज  पोस्ट करावे  असा विचार येताच , प्रवेश देताना तो फक्त  अणि फक्त जाड़ीवरच   अवलंबून असल्यामुळे हे माझे अखिल भारतीय स्वप्न सत्यात उतरलेले नाही।
( टीप  :पुण्यात प्रत्येक चळवळ ही अखिल भारतीय & प्रत्येक गोष्ट ही जगात भारी असते )

खाल्लेले अंगाला लावून घ्यायला पण भाग्य लागते। भरपूर चापून खाऊन देखील कृश राहिलेले अभागी  थोड़े (?)खाऊन पण मोकळेपणाने अंगावर खेळविणाऱ्या माझ्यासारख्याला लठ्ठ म्हणतात त्यावेळी भूतदयेखेरिज कुठल्याही नजरेने मी त्यांना  पाहू शकत नाही। 

हा माझ्यामते लहानपणापासूनच्या अन्नसंस्काराचा भाग असावा । खाणे  हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्याबरोबर जीवनातील अत्यंत सुंदर आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत। बन मस्का , वडा पाव , दाबेली , भेळ , पटिस  असले अरबट-चरबट  पदार्थच आवडण्याच्या  काळात " सोकावली आहेत कार्टी,नुसते बाहेरचे खायला पाहिजे, ख़बरदार सारखे बाहेर खाल तर  " असा दम भरला जायचा। त्यावेळेला आमची आजी तिचे वय विसरुन आम्हा मुलांच्या चावटपणात सामिल व्हायची। आमचा आणि आजीचा करार असायचा मग आजी हळूच  दर रविवारी  बाबा कामाला गेले की आम्हाला वर्दी द्यायची व दुसऱ्या क्षणी  " खमंग गरमागरम पटिस अणि बनपाव घेऊन यायला आम्ही मार्केटमध्ये धूम ठोकलेली असायची। परत आल्यावर गरमागरम चहा , मऊ लुसलुशित बनपाव  आणि  खमंग  पटिस" असा जंगी बेत असायचा।  चहा आणि बनपाव ही जोडीच अशी आहे की खुप वर्षे नुसता पाव पण आपण खाऊ शकतो यावर माझा विश्वासच बसायचा नाही।  माझी आजी  मूळची नागपूरची असल्यामुळे क्षुधातृप्तीनंतर  "वा मज़ा आला " ही तिची प्रतिक्रिया म्हणजे आनंदाची परमावधी असायची।  पुढे थोड़े मोठ्ठे झाल्यावर या आमच्या खवय्येगिरिच्या ( किंवा खादाडीच्या  ) प्रवासातील आमचे सहप्रवासी होते माझे बाबा आणि नंतर मामा। कुठलेही नविन हॉटेल निघाले की  आमची स्वारी पहिल्या एक-दोन आठवड्यामध्ये तिथे पोचलेली असायची।  त्याकाळात जर " Hotel rating Apps" असते तर पॉकेटमनीला पुरेल इतके पैसे तर या व्यापातून  नक्कीच जमा झाले असते।  पुढे शिक्षणासाठी / नोकरीसाठी  मुंबईला किंवा पुण्याला असताना   'खिड़की वडा/ जोशी वडा', 'अप्पाची खिचड़ी', 'काटाकिर मिसळ', 'संतोष बेकरीचे  पटिस', 'कयानी बेकरीचा मावा केक' , शनिवारवाडयाच्या बाहेरच्या गाडीवरील डोसा , लोणावळ्याचा   " कामत  बटाटा वडा " किंवा 'कूपर फ़ज ', मद्रास कैफेचा ' मसाला डोसा , पाइनएप्पल शिरा ',ताड़देवची सरदार पावभाजी,पार्लेश्वर वडा पाव   ही म्हणजे आमच्या साठी खाद्य-तीर्थक्षेत्रेच  ! त्यात उत्साही असा माझा मामा म्हणजे आम्हा खवय्यांचा म्होरक्या।  एकदातर नवीन झालेला एक्सप्रेसवे दाखविणाच्या  निमित्ताने त्याने आम्हाला जुन्या गोवा हाईवे  जवळच्या   "दत्त  स्नैक्स " या टपरीतील "साबूदाणा  खिचड़ी अणि खरवस " खाऊ  घातले।  जीभेवर विरघळणाऱ्या त्या खरवसाची चव  अजूनही ताजी आहे।  आज त्याच दत्तचे खालापुर टोलप्लाज़ा जवळ मोठे होटेल आहे।  

सांगायचा मुद्दा असा की ही  आवड , कळकळ , उदरभरणातला  आनंद   डॉ दीक्षित किंवा  ऋतुजा दिवेकर (  साइज जीरो फेम करीना कपूरची आहार सल्लागार)  यांच्या डाइट प्लान च्या मागे झपाटलेल्या फिटनेस  प्रेमी  लोकांना  कोण समजावणार ! सध्या सेल्फी , इंस्टाग्राम फोटो च्या जमान्यात " फिगर " ला आलेले अवास्तव महत्त्व दूसरे काय।  

आता डॉक्टर लोकांचे विचाराल तर  त्यांचे पोट दुसऱ्यांनी खाल्लेल्या गोळ्यांनी भरत असल्याने  आपण किती पोळ्या खाव्यात किंवा खाऊ नयेत यावर सल्ला द्यायला ही मंडळी मोकळी  असतात। कारण  पोळी ऐवजी गोळी खपविण्यात त्यांचा फायदा आहे।  असो। 

माझे सोडा , पण  भारतीय  परंपरा , संस्कृति , सणवार  हे जर आपण तपासून पाहिले तर ती  एक मोठी अन्न चळवळच  आहे।   उत्सवात असणाऱ्या जेवणावळी , पंगती असोत किंवा आपले सण-समारंभ असोत , खाद्य  हे त्या प्रक्रियेचा महत्वाचा घटक आहे।  तिळाची वडी किंवा तीळगूळ असल्यामुळेच संक्रांत न ओढवता ती साजरी करता येते।  होळीच्या सणातून पूरणपोळी बाजूला काढ़ा , बोम्ब मारायला ऊर्जा कुठून येणार।  गुढीपाडवा साजरा करताना श्रीखंड  गरजेचे असतेच  ना।  रामनवमीतुन सुंठवडा किंवा कृष्णजन्माष्टमीतुन  दहिपोहे / दहिलाह्या  , हनुमान जयंतितून " खड़ी साखर खोबरे " वगळा , माझा अंदाज आहे बहुतेक लोक स्वःतला नास्तिक घोषित करतील। एवढेच कशाला  गणपतीला  उकडीचे मोदक  किंवा सत्यनारायणला शिरा नसेल तर  ते देवालाही चुकल्यासारखे वाटेलच ना। कलियुगातला सत्यनारायण शिरा नाही म्हणून कोपायचा वैगरे ! दिवाळीतून फराळ काढला    किंवा कोजागिरी पौर्णिमेतून  मसाला दूध वगळा , आता सणात काही राम राहिला नाही अश्या प्रतिक्रियांचा पाऊस पडेल।  

माझ्या मते  समृद्ध राष्ट्र  या संकल्पनेमध्ये  खवय्यांना पण स्थान असणे गरजेचे आहे।  खाउन तृप्त झालेली माणसे किमान वायफळ बडबडीमध्ये वेळ वाया घालवत नाहीत।  "Productivity Index" मध्ये  या गोष्टीचा समावेश करण्यासाठी तज्ञांनी जरूर विचार करावा। " उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म। " म्हटले आहे ते काय उगीच नव्हे। जठराग्निला भरपूर आहुत्या पडल्या पाहिजेत।  हे "चित्त विशाल होण्यासाठीचे " पुण्यकर्म आहे। 
आजकाल " intolerance debate" खूप जोरात आहेत ,  उदरभरणाकडे  केलेले दुर्लक्ष तर त्याच्या मागे नाही ना हे तपासले पाहिजे। 

शेवटी काय "या जन्मावर या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे ", यातले जगणे हे खाण्याशी निगडित असल्यामुळे , खात रहा , खिलवत रहा। 

सर्व खवय्यांना जागतिक "वडा पाव " दिनाच्या शुभेछा ! 


                              कै. श्रीकांत अभ्यंकर (सर ) स्मृती व्याख्यान ( वर्ष -दहावे  ) सप्रेम  नमस्कार , सांगली शहरातील विद्यार्थीप्रिय ...