कै. श्रीकांत अभ्यंकर (सर ) स्मृती व्याख्यान ( वर्ष -दहावे )
सप्रेम नमस्कार ,
सांगली शहरातील विद्यार्थीप्रिय शिक्षक , कै. श्रीकांत अभ्यंकर (सर ) यांचा स्मृतीदिन अभ्यंकर परिवार , त्यांचे स्नेही मिळून आयोजित करतात.
यावर्षी या समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रवीन थत्ते यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
विषय : "आपल्या सगळ्यांची गोष्ट "
तरी या कार्यक्रमास आपण अगत्यपूर्वक उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती .
आपले ,
अभ्यंकर परिवार
स्थळ : नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम , भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट , ८१२ शिवाजीनगर, लॉ कॉलेज रोड , पुणे-४११००४
वेळ : रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ सकाळी ११: ०० वाजता
********************************************************************************************************
=======================================
कै. अभ्यंकर सर स्मृती व्याख्यानमालेतील गेल्या नऊ वर्षातील प्रमुख वक्ते :
२०१५ : श्री अच्युत गोडबोले : विषय: माझा लेखनप्रवास
२०१६ : श्री देवदत्त पटनायक विषय: "Puranas: The Fruits of Vedic Tree"
२०१७ : श्री गिरीश कुबेर : विषय :" What It takes to be superpower"
२०१८ : सौं अनुराधा प्रभुदेसाई : विषय : ऋणानुबंध सैनिकांशी: कारगिल शौर्यगाथा
२०१९: श्री सुधीर गाडगीळ : विषय : मुलखावेगळी माणसे :अनुभवांचे किस्से कथन
२०२०: श्री चंद्रशेखर टिळक : विषय : आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक
२०२१: श्री अविनाश धर्माधिकारी : विषय : भारत आणि जगापुढील धोके
२०२२: श्री अजित आपटे : विषय : अपरिचित शिवाजी
२०२३: श्री अमेय पांगारकर : विषय : Artificial Intelligence- आज आणि उद्या
=====================================================
प्रमुख वक्ता परिचय
डॉ रवीन थत्ते , एक प्रथित यश प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरीचे अभ्यासकही आहेत. जवळ जवळ चाळीस वर्षे ज्ञानेश्वरीचा अभ्यास , व्यासंग , त्यांना गीता -ज्ञानेश्वरी वाचताना पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळविताना झालेले विचारमंथन त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकातून मांडले आहे
यातून रोजच्या जगण्याची ज्ञानेश्वरीची गुंफण घातली की जगणं सार्थ होते हे सूत्र डॉक्टर उलगडून सांगतात .
प्रकाशित साहित्य /पुस्तक
नित्य नूतन देखिजे (Geeta Revisited )
जाणीव -भाग १/२
मी हिंदू झालो
प्रपंचाचे ज्ञान तेच विज्ञान
विज्ञानेश्वरी
पुरस्कार
१९८१ ते १९९० च्या दशकात ब्रिटिश जर्नल ऑफ प्लास्टिक सर्जरी ह्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात सर्वात जास्त शोधनिबंध लिहल्याची नोंद
हरी ओम आश्रम रंगाचारी पारितोषिक , असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया
एरीक पिट पारितोषिक ,असोसिएशन प्लास्टिक सर्जन्स ऑफ इंडिया
अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठात सन्मानित प्राध्यापक , फुल ब्राईट स्कॉलरशिप
विकसनशील राष्ट्रां साठी योग्य अशा शस्त्रक्रिया शोधून काढल्याबद्दल मलेशियातील सुघटन शल्यचिकित्सकांच्या संस्थेकडून सन्माननीय सभासदत्व
No comments:
Post a Comment